घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात बस कोसळली

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात बस कोसळली

Subscribe

मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली. पुण्याकडे जाणाऱ्या आरामबसचा अवघड वळणावर अपघात झाला. अवघड चढणीवर वळण घेताना गाडी चढणीवरुन पाठीमागे येऊन सुरक्षा काठड्यावर अडकली. या अपघातात काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. बाकी सर्व सर्व प्रवासी सुखरुप आहेत. जखमी प्रवाशांना खोपोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आयआरबी यत्रंणा, खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस यांच्या टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा झाला असून, बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

बस कोसळली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -