घरमहाराष्ट्रहातगाडी लावण्यावरून व्यावसायिकांचा वाद; लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण

हातगाडी लावण्यावरून व्यावसायिकांचा वाद; लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण

Subscribe

कच्ची दाबेलीची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने दुसऱ्या व्यवसायिकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

कच्ची दाबेलीची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादात एकाने दुसऱ्या व्यवसायिकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर देहूरोड पोलिसांनी ठोस पाऊल उचलत मारहाण करणाऱ्या नागेश्वर विरोधात गुन्हा दाखल केला असून अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आलं आहे. राजू गुजर असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नागेश्वर असं आरोपीचे नाव आहे. दोघे ही परराज्यातून येऊन कच्ची दाबेलीचा व्यवसाय करत आहेत.

आरोपीचा शोध सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू आणि आरोपी नागेश्वर यांचा कच्ची दाबेलीचा व्यवसाय आहे. ते दोघेही अनेक दिवसांपासून भोंडवे कॉर्नर येथे हातगाडी लावतात. परंतू काल, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यात हातगाडी लावल्यावरून वाद झाला. माझ्या शेजारी गाडी लावायची नाही तू इथून जा, असं आरोपी फिर्यादीला म्हणाला. तेव्हा, माझी गाडी इथेच लावणार, असं उर्मट उत्तर फिर्यादी गुजर यांनी दिलं. त्यामुळे चिडलेल्या नागेश्वर याने लोखंडी रॉडने राजू गुजर याला बेदम मारहाण केली. त्याचा व्हिडिओ सहकाऱ्याने मोबाईलमध्ये चित्रित केला. मारहाण एवढी जबर होती की, राजुच्या मांडीवर व्रण उठले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल करून घेतला आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यास पथक रवाना झाल्याच सांगण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा –

Video: फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने केलेल्या योगा स्टेप व्हायरल

वीस सात ‘सत्तावीस’, तीस आठ ‘अडतीस’; हे आहे गणिताचे अजब पुस्तक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -