घरदेश-विदेशसाखर उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे ८५०० कोटींचे पॅकेज

साखर उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे ८५०० कोटींचे पॅकेज

Subscribe

साखर उत्पादकांसाठी साखरे एवढीच गोड बातमी आहे. साखर उत्पादकांसाठी सरकारने ८ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सरकारने जाहीर केलेल्या ८ हजार ५०० कोटींमध्ये, ४ हजार ५०० कोटीच्या सॉफ्ट लोनचा देखील समावेश आहे. या सॉफ्ट लोनचा उपयोग इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी करण्यात येणार आहे. सोबतच ३ दशलक्ष टनाच्या स्टॉकच्या पुरवठ्यासाठीसुद्धा या पॅकेजमध्ये योजना करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथेनॉलचं उत्पादन वाढण्यासाठी १३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

इथेनॉलचा पेट्रोलच्या मिश्रणासाठी उपयोग

ऊस कारखान्यातील इथेनॉल निर्मितीचा पेट्रोलच्या मिश्रणासाठी उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळेल. तसेच देशांतर्गत करण्यात येणाऱ्या तेलाची आयात कमी होईल.

- Advertisement -

शेतकऱ्यांना दिलासा देणारं पॅकेज

एकिकडे राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरु असताना सरकारने साखर उत्पदकांसाठी जाहीर केलेलं हे पॅकेज म्हणजे एक प्रकारे दिलासा देणारच ठरणारं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -