घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे चार मंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे चार मंत्री

Subscribe

नारायण राणे कॅबिनेट, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड राज्यमंत्री,राष्ट्रपती भवनात शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी ४३ जणांना मंत्री आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यापैकी १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातील खासदार नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांना अद्याप खाते देण्यात आलेले नाही. मात्र, नारायण राणेंना केंद्र सरकारने नवीनच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर ७ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यापैकी १४ जण ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या टर्ममध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामधील 15 मंत्र्यांना कॅबिनेट तर 28 मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. 2022 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका आणि 2024 ची लोकसभा निवडणूक पाहता हा मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांमध्ये किंवा पुढील वर्षी देशात विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तिथे भाजपने 7 मंत्रिपदे दिली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटक, त्रिपुरा, गुजरात आणि उत्तराखंड या राज्यातील नेत्यांनाही भाजपने मंत्रिपदे दिली आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारातून त्या त्या राज्यांमध्ये भाजपच्या पक्षसंघटनेला बळ मिळण्याची शक्यता आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल यांचाही मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

१५ कॅबिनेट मंत्री
१. नारायण राणे, २. सर्वानंद सोनोवाल, ३. विरेंद्र कुमार, ४. ज्योतिरादित्य शिंदे, ५. रामचंद्र प्रसाद सिंह, ६. अश्विनी वैष्णव, ७. पशुपती कुमार पारस, ८. किरेन रिजीजू, ९. राजकुमार सिंह, १०. हरदीप सिंग पुरी, ११. मुकेश मांडवीय, १२. भुपेंद्र यादव, १३. पुरुषोत्तम रुपाला, १४. जी. किशन रेड्डी, १५. अनुराग सिंह ठाकूर

२८ राज्यमंत्री
१. पंकज चौधरी, २. अनुप्रिया सिंह पटेल, ३. सत्यपाल सिंह बघेल, ४. राजीव चंद्रशेखर, ५. शोभा करंदजले, ६. भानु प्रताप सिंह वर्मा, ७. दर्शना विक्रम जरदोश, ८. मिनाक्षी लेखी, ९. अन्नपूर्णा देवी, १०. ए. नारायणस्वामी, ११. कुशाल किशोर,१२. अजय भट्ट, १३. बी. एल. वर्मा,१४. अजय कुमार, १५. चौहान देवुसिन्ह, १६. भगवंत खुबा, १७. कपिल मोरेश्वर पाटील,१८. प्रतिमा भौमिक,१९. सुभाष सरकार, २०. भागवत किशनराव कराड, २१. राजकुमार रंजन सिंह, २२. भारती प्रवीण पवार, २३. बिश्वेश्वर तुडू, २४. शंतनू ठाकूर, २५. मंजुपारा महेंद्रभाई, २६. जॉन बारला,२७. मुरूगन, २८. निसिथ प्रामाणिक

या १२ मंत्र्यांनी दिले राजीनामे
1) थावरचंद गहलोत, 2) सदानंद गौड़ा, 3) रविशंकर प्रसाद, 4) रमेश पोखरियाल निशंक, 5) डॉ. हर्ष वर्धन
6) प्रकाश जावडेकर, 7) बाबुल सुप्रियो, 8) संतोष गंगवार, 9) संजय धोत्रे, 10) रतन लाल कटारिया, 11) प्रताप सारंगी, 12) देबोश्री चौधरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -