घरताज्या घडामोडीदोन दिवसात खातेवाटप होईल, तर सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत निवडणुका; सुधीर मुनगंटीवारांचे मोठे वक्तव्य

दोन दिवसात खातेवाटप होईल, तर सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत निवडणुका; सुधीर मुनगंटीवारांचे मोठे वक्तव्य

Subscribe

महिन्याभरानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंजे गटाच्या आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. या शपथविधीनंतर उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.

महिन्याभरानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंजे गटाच्या आणि भाजपाच्या प्रत्येकी 9 आमदारांना राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. या शपथविधीनंतर उर्वरीत मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. अशातच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठे विधान केले आहे. “दोन दिवसात राज्यातल्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होईल”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच, येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (Cabinet will be divided in two days elections by September or October says bjp leader Sudhir Mungatiwar)

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर मंत्रिमंडलाचा विस्तार नेमका कधी, होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्यस्थितीत शिंदे-भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. यावर, “सरकार पडल्याची मळमळ असल्याने विरोधक ही टीका करत आहेत”, असा टोला मुनगंटीवारांनी विरोधकांना लगावला आहे.

- Advertisement -

“अनेकजण निवडणुका त्यात व्यस्त होते. मात्र आता सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय ओबीसी संदर्भात घेतला”, असेही त्यांनी म्हटले.

“शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विरोधी पक्ष आम्हाला हवा आहे. राजकारणात पॉलिटिकल अल्झायमर असू नये. निदान टीका तेव्हा करावी जेव्हा ती कृती आपल्या हातून झाली नसावी”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

- Advertisement -

“पंकजा मुंडे आमच्या आदरणीय नेत्या आहेत. मी त्यांच्या सोबत वैयक्तिक बोलेल, त्यांचे योगदान पक्षासाठी महत्वाच आहे . त्यांनी काय म्हटले ते मला माहित नाही”, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

“खातेवाटपाचा याच्याशी संबंध नाही. काँग्रेस आणि शिवसेनेची नैसर्गिक आघाडी नव्हतीच. नाना पटोले काय म्हणाले या पेक्षा बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले याला महत्व आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा निर्णय बाळासाहेब ठाकरे असताना झाला. 2014 पासून नमंतरासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या”, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले.


हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा धक्का, निवडणूक आयोगाकडून १५ दिवसांचीच मुदत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -