घरमहाराष्ट्रकसबा पोटनिवडणूक बिनविरोधात! वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, बावनकुळेंचं सूचक विधान 

कसबा पोटनिवडणूक बिनविरोधात! वेळ आहे, उमेदवार बदलता येईल, बावनकुळेंचं सूचक विधान 

Subscribe

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ही निवडणुक बिनविरोधात व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे  प्रयत्न करत आहे. मात्र मविआने ही निवडणुक बिनविरोधात होणार नाही असं जाहीर केल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. अशात भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे कसबा निवडणुक बिनविरोधात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कसबा पोटनिवडणुकीबाबत एक मोठं विधान केलं आहे. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं सूचक विधान बावनकुळे यांनी केलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, पक्ष विचार करेल, असंही बावनकुळे म्हणाले.

दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणूक बिनविरोधात करण्याबाबत 48 तासांत उमेदवार बदलतो, निवडणूक बिनविरोध करणार का? असं आव्हान महाविकास सरकारला  दिलं होतं. यावर आव्हानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळ आहे. उमेदवार बदलता येईल, म्हणत विरोधकांना बुचकळ्यात टाकलं आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली जाईल, चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्त्व विचार करेल, चंद्रकांत पाटील यांची भूमिका पक्षाला मान्य आहे, महाविकास आघाडीने आज तसं कळवतं तर उद्याचा दिवस बाकी आहे. उमेदवार बदलण्याचा निर्णय निश्चितपणे घेता येईल, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

- Advertisement -

मुक्ता टिळक हयात असत्या तर प्रश्न नव्हता. कोणी कोणाला डावलतं नाही. ब्राह्मण समाजाने भाजपासाठी आयुष्य दिलं आहे. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिला आहे आणि ब्राह्मण समाजानेही खूप काही दिलं आहे. महाविकास आघाडीने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोधात करण्यासाठी पाठिंबा दिला तर उमेदवार बदलण्याचा विचार केला जाईल, भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकास आघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोधात करण्यास आम्ही तयार आहे, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.


‘या’ जिल्ह्यात मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिट दरात मिळणार 30 टक्के सवलत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -