घरताज्या घडामोडीसुप्रिया सुळेंना घरी जा, स्वयंपाक करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माफिनामा, पत्रातून दिलगिरी...

सुप्रिया सुळेंना घरी जा, स्वयंपाक करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माफिनामा, पत्रातून दिलगिरी व्यक्त

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चौफेर टीकेचा सामना केल्यानंतर राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना घरी जा आणि स्वयंपाक करा असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटलांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आले होते. हे प्रकरण राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचलं होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली होती. परंतु चंद्रकांत पाटील यांनी थेट राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रिया सुळे किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिले आहे. आपण ग्रामीण म्हणीचा वापर केला असल्याचे पाटलांनी सांगितले आहे. चंद्रकांत यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेते आणि महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. भाजपवर टीकास्त्रा डागण्यात आले होते. चौफेर टीका झाल्यानंतर पाटलांनी माफीनामा सादर केला आहे.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील पत्रात काय म्हणाले?

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रिया सुळेंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रिया सुळे किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. आशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.


हेही वाचा : बृजभूषण सिंहांच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, मुंबईतील उत्तरभारतीयांचा राज ठाकरेंना पाठिंबा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -