घरदेश-विदेशइलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्र सरकारचे 1 ऑक्टोबरपासून नवे नियम

इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्र सरकारचे 1 ऑक्टोबरपासून नवे नियम

Subscribe

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करणार आहे. यात विद्यमान बॅटरी सुरक्षा मानकांमध्ये काही सुधारणांसह इलेक्ट्रिक वाहनांसाठी नियम तयार करण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे सरकारने हे नियम तयार केले आहेत. बॅटरी आगीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन केले होती. या समितीच्या अहवालावर आधारित MORTH ने इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी AIS156 सुरक्षा मानकांचे नोटिफिकेशन जारी केले आहे.

ईव्ही आगीच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या समितीने 29 ऑगस्ट 2022ला आपला अहवाल सादर केला होत. यानंतर इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह एल श्रेणीतल्या वाहनांचा समावेश आहे, श्रेणी एम आणि श्रेणी ए वाहनांसाठी नवीन सुरक्षा नियम तयार करण्यात आले. श्रेणी L मध्ये चार चाकांपेक्षा कमी असलेल्या वाहनांचा समावेश होतो. श्रेणी M आणि N मध्ये चार चाकी वाहने समाविष्ट आहेत जी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. नवीन नियमांमध्ये बॅटरी सेल, ऑन-बोर्ड चार्जर, बॅटरी पॅकची रचना आणि अंतर्गत सेल शॉर्ट सर्किटमुळे थर्मल ट्रान्सफरशी संबंधित अतिरिक्त सुरक्षा समाविष्ट आहे.

- Advertisement -

या समितीने सादर केला आव्हाल –

विशेष समितीत नरसिंह राव (संचालक, ARC’, हैदराबाद), MK जैन (शास्त्रज्ञ – G, CFEES, DRDO), डॉ. आरती भट्ट (वैज्ञानिक-F), अतिरिक्त संचालक, CFEES, DRDO) , डॉ. सुब्बा रेड्डी (मुख्य संशोधन शास्त्रज्ञ, IISc, बंगलोर), प्रा. एल उमानंद (अध्यक्ष, DESE, IISc, बेंगळुरू), डॉ. एम. श्रीनिवास (शास्त्रज्ञ-ई, NSTL, विशाखापट्टणम), प्रा. देवेंद्र जालिहाल (प्रमुख, C-BEEV, 11T मद्रास, चेन्नई) यांचा समावेश होता.

- Advertisement -

ड्रायव्हर्ससाठी अलर्ट प्रणाली: इलेक्ट्रिक वाहन थर्मल इव्हेंट्स किंवा सेलच्या थर्मल रनवे बाबत लवकर माहिती मिळेल.यामुळे आग लागल्यास त्याची पूर्वसूचना चालकाला असेल.

सेफ्टी फ्यूज : इलेक्ट्रिक वाहनात सेफ्टी फ्यूज बंधनकारक करण्यात आले आहे. हे हाय करंट फ्लो निर्माण झाल्यास बॅटरी ताबडतोब डिस्कनेक्ट करेल.

बॅटरी सेलमधील अंतर: EV मध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरीमधील दोन सेलमधील अंतर देखील वाढवले ​​जाईल. रिचार्जेबल एनर्जी स्टोरेज सिस्टम मध्ये थर्मल रनअवे झाल्यास उष्णता सोडण्यास मदत करण्यासाठी आणि सेल्सना वेगळे करण्यात मदत करण्यासाठी पॅनेलद्वारे आपोआप शिफारस केली जाईल.

चार्जरसाठी ऑटो कट ऑफ वैशिष्ट्य: चार्ज व्होल्टेज कट-ऑफसह वेळ-आधारित चार्ज कट-ऑफ कार्य समाविष्ट करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जरची पुनर्रचना केली जाईल. ही यंत्रणा जास्त चार्जिंग टाळण्यास मदत करेल.

4 अतिरिक्त सेन्सर: आता इलेक्ट्रिक वाहनात ४ अतिरिक्त सेन्सर असतील. हे बॅटरी सिस्टममधील कोणत्याही समस्या ओळखण्यात मदत करतील. हा सेन्सर वाहनाच्या कन्सोलवर एरर दाखवेल, जो रायडरला अलर्ट करेल.

अतिरिक्त BMS वैशिष्ट्य: इलेक्ट्रिक पॉवर ट्रेनने सुसज्ज असलेल्या सर्व दुचाकींना ओव्हर-व्होल्टेज, ओव्हर-चार्ज, ओव्हर-डिस्चार्ज, जास्त-तापमान, ओव्हर-करंट आणि शॉर्ट सर्किट संरक्षणासाठी वैशिष्ट्यांसह प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणालीची आवश्यकता असेल.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -