घरदेश-विदेशनितीन गडकरींची मोठी घोषणा; तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाचे काम...

नितीन गडकरींची मोठी घोषणा; तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई- गोवा महामार्गाचे काम ‘या’ दिवशी होणार पूर्ण

Subscribe

मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी मुंबई- गोवा महामार्गाचे काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या कामासाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आता नितीन गडकरी यांनी प्रथमच गोवा- मुंबई द्रुतगती महामार्गाचे विलोभनीय फोटो शेअर केले आहेत. तब्बल 12 वर्षे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना केल्या. यामुळे या महामार्गाच्या कामास वेग येणार असून लवकरच मुंबईवरुन सुसाट गोव्याला जाता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काॅंक्रिटीकरण कामचे भूमिपूजन खारपाडा टोलनाका येथे आज, 30 मार्चला करण्यात आले. यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर महिना अखेर संपूर्ण महामार्ग पूर्ण होईल, असे गडकरी यांनी जाहीर केले. मुंबई- गोवा महामार्गाबाबतीत मी दु:खी आहे. 10 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. या रस्त्याच्या कामानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होईल, असे गडकरी म्हणाले.

डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार काम

 गेल्यावर्षी इंदापूर ते कासू दरम्यानच्या काॅंक्रिटीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. अजूनही त्या कामाला सुरुवात झालेली नाही. गुरुवारी झालेल्या भुमिपूजनामुळे कामाला गती येईल, असा दावा खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. मुंबई- गोवा महामार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. यावेळी मुंबई- गोवा महामार्गाचे काम 9 महिन्यांत पूर्ण करण्याची जबाबदारी घेत असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. तसेच, जर काम पूर्ण केले नाही तर कामांमध्ये अडचणी आणणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराच नितीन गडकरी यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: हेट स्पिच प्रकरण : निलंबित भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून FIR दाखल )

कोकणातील पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न

पळस्ते ते इंदापूर या मार्गाचे काम यावर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. तसेच, राज्यात सॅटेलाईट बेस टोल बसवले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जेएनपीटी ते दिल्ली 12 तासांत पोहोचता येणार आहे. कळंबोली येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यात येणार आहे. एकूण सुमारे 15 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. कोकणातील पर्यटन वाढीसाठी एॅम्फीबीअस सी- प्लेनचे नियोजन करण्याचा विचार आहे. कोकणाचा आर्थिक, औद्योगिक विकास करण्याची गरज आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

रायगड जिल्हा विकासाकडे जाणारा जिल्हा आहे. तसेच कोकणातील सर्व खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी मिळून कोकणच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घ्यावा. सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, शासन, लोकसहभाग आणि खाजगी संस्था अशा एकत्रित गुंतवणुकीतून कोकणातील अनेक विकास कामे होऊ शकतात, असे आवाहन करून येथील जलशक्तीचा वापर करून पर्यटन आणि दळणवळणाच्या उद्देशाने लांबच लांब समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रदेशासाठी सी प्लेन, हॉवरक्राफ्ट आणि वॉटर टॅक्सी सिस्टिमच्या व्यवहार्यतेचा महाराष्ट्र राज्याने अभ्यास करावा. या पर्यायांना लवकरात लवकर प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करायला हवे, त्यासाठी माझ्याकडूनही सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल. त्यातून आपल्या देशाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या या कोकणचा पर्यटन व औद्योगिक दृष्टीने निश्चितच विकास होईल. यामुळे स्थानिक युवकाला रोजगार मिळेल,असा विश्वास गडकरी यांनी शेवटी व्यक्त केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -