घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

Subscribe

करीरोड ते परळ स्थानकादरम्यान लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. करीरोड ते परळ स्टेशनदरम्यान लोकल बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यामुळे गाड्या एकामागोमाग एक उभ्या आहेत. परिणामी मध्य रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे. सकाळी ६.४५ च्या दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ५ लोकल एकामोगमाग एक उभ्या आहेत. बिघाडामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. काही प्रवाशांनी चालत जात दादर आणि परळ स्टेशन परळ गाठणे पसंत केले. तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -