घरठाणेलाइनमनमुळे टळला कल्याणमधील संभाव्य अपघात, मध्य रेल्वे करणार सन्मान

लाइनमनमुळे टळला कल्याणमधील संभाव्य अपघात, मध्य रेल्वे करणार सन्मान

Subscribe

कल्याण – रेल्वे रुळाला तडा गेल्याने आज मध्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. गर्दीच्या वेळेसच हा प्रकार घडल्याने कामाला निघालेल्या नोकरदार वर्गाला आज कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला. मात्र, कल्याण-ठाकुर्ली दरम्यान असलेल्या दोन लाईनमनमुळे आज मोठा अनर्थ टळला आहे. रुळाला तडे गेल्याचं लाईनमनच्या दृष्टीस पडल्याने त्यांनी तत्काळ वरिष्ठ पातळीवर सूचना दिली आणि त्यानुसार तांत्रित दुरुस्ती करण्यात आली.

हेही वाचा – कल्याणमध्ये रेल्वे रुळाला तडा, पुणे-नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना विलंब; लोकलसेवाही विस्कळीत

- Advertisement -

मुंबईहून कल्याणच्या दिशेने अतिशय वेगाने येणारी इंद्रायणी एक्स्प्रेसला मिथुनकुमार आणि हिरालाल यांनी लाल कंदील दाखवल्याने ही एक्स्प्रेस थांबली, अन्यथा मोठा अपघात घडू शकला असता. रुळांची पाहणी करण्याचं काम या लाईनमनकडे असतं. हे दोघेही लाईनमन रुळांची पाहणी करण्याचं दैनंदिन काम करत असताना त्यांना ठाकूर्ली कल्याण मार्गावरील डाऊन फास्ट रुळावर पत्रिपुलाजवळ रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पातळीवर याची माहिती दिली. त्यामुळे रेल्वे थांबवण्यात आली. तसेच, लोकलसेवाही विस्कळीत झाली. अप जलद मार्गावरच्या लोकलसेवेला यामुळे फटका बसला.

दरम्यान, या दोन लाईनमनच्या प्रसंगवधानामुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचल्याने त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत रुळांवर लोखंडी ड्रम ठेवून घातपाताचा प्रयत्न, मोटरमनच्या सतर्कतेमुळे संभाव्य विघ्न टळले

मोटरमनमुळे टळले विघ्न

काही दिवसांपूर्वी मोटरमनच्या सतर्तकेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला होता. सॅण्डहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यान रुळांवर लोखंडी ड्रम पडले होते. मोटनमनच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी लागलीच इमरजन्सी ब्रेक दाबला त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -