घरताज्या घडामोडीपवारांच्या अजेंड्यावर राऊतांचे काम, अडीच वर्षात सत्ता घालवतील, चंद्रकांत पाटलांची टीका

पवारांच्या अजेंड्यावर राऊतांचे काम, अडीच वर्षात सत्ता घालवतील, चंद्रकांत पाटलांची टीका

Subscribe

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद शाधला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना पक्षाचा गोव्यातील निवडणुकीत समावेश, यावर टीका केली आहे. संजय राऊतांना मी सल्ला दिलेला नाही आणि त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही. परंतु आमच्या आकलनानुसार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत. अडीच वर्षात मुख्यमंत्रीपद घालवणे हे त्यांचा अजेंडा असल्याची खरमरीत टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

कोण संजय राऊत?

चंद्रकांत पाटलांनी राऊतांना ज्ञान शिकवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पाटील म्हणाले की, संजय राऊतांना मी सल्ला दिलेला नाही आणि त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे मित्र आहेत. तसेच अनेक वर्ष आम्ही एकत्र कामं केली आहेत. कोण संजय राऊत?, काल-पर्वा शिवसेनेत आले आणि आम्हाला शिकवत आहेत.

- Advertisement -

पवारांच्या अजेंड्यावर राऊतांचे काम

आमच्या आकलनानुसार संजय राऊत शरद पवारांनी दिलेल्या अजेंडावर काम करत आहेत. या अजेंड्याचं कारण की, ठाकरे सरकारला मुख्यमंत्रीपदी बसून अडीच वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदावरून घालवणे आणि मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम करणे, अशा प्रकारचा राऊतांचा अजेंडा असल्याचं पाटील म्हणाले.

गोव्यातील सरकार आमच्याशिवाय स्थापन होऊ शकत नाही

गोव्याच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा देखील समावेश होता. परंतु सर्व उमेदवारांना मिळून फक्त ७४३ मतं मिळाली होती. असं असताना देखील गोव्यातील सरकार आमच्याशिवाय स्थापन होऊ शकत नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यातून जागा उभा केल्या असल्यातरी यूपीमध्ये दरवेळेस डिपॉझिट जातं, असं पाटील म्हणाले.

- Advertisement -

२०१९ मध्ये सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना १२० आणि २२० वर जागा मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या वलगणा करण्यात आल्या होत्या. परंतु मतदानाच्या दिवशी खात्यांचं वाटप सुरू झालं आणि पेट्या फुटल्यानंतर मोदींना ३०३ जागा मिळाल्या. रणनितीकार प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी यांना आशा न बाळगण्यास सांगितलं आहे. मात्र, इतर वेळी त्यांना प्रशांत किशोर यांचा सल्ला लागतो. परंतु यावेळी ते घेण्यास तयार नाहीत.


हेही वाचा : International Mother Language Day 2022: आज जागतिक मातृभाषा दिन, या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास काय?, जाणून घ्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -