घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांचे परिणाम नवाब मलिकांना भोगावे लागणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा परिणाम भोगावा लागणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक नवाब मलिक यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील विषयांवर नागरिकांचे दुर्लक्ष करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते बेछूट आरोप करत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच राज्य सरकारकडे यंत्रणा आहेत त्यांनी चौकशी करावी असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते बेछूट आरोप करत आहेत. त्यांना समीर वानखेडेंवर आरोप करायचे असतील तर आरोप करताना परिणामांची काळजी करावी पण भाजपला यामध्ये ओढण्याचे आणि फडणवीसांना ओढण्याचे परिणाम खूप भोगावे लागती असा इशारा पाटील यांनी दिला. तसेच याचे कारण पुराव्याशिवाय आपण बोलतो त्यावेळी पुरावे सापडले नाही तर जी स्थिती होती ती फार वाईट असते असे चंद्रकांत पाटील यांनी म्ह्टलं आहे.

- Advertisement -

नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडी प्रत्येक वेळी असा एक चेहरा उभा करते की, त्या चेहऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नापासून लोकांचे लक्ष विचलित करायचे, महाराष्ट्रात महापूर येऊन गेला, अतिवृष्टी झाले. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान झालं. पाऊस जास्त नसताना पूर का आला याची चौकशी व्हायची आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा मिळायचा आहे. कोविडमध्ये घोषित केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी बाकी आहे. एसटीचा प्रश्न आहे यामध्ये जवळपास २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रश्नावर बोला यावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही बोलण्यासाठी नसल्यामुळे बेछूट आरोप करण्यात येत आहेत अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप वानखेडेंना पाठिंबा देणार

महाविकास आघाडीमधील मंत्री आर्धे गाबय आहेत. राज्यातील गृहमंत्री ज्यांच्या आधारे जनतेने सुरक्षित राहायाचे असते तेच आता फरार आहेत त्यांना शोधा, सरकार असताना गृहमंत्री गायब कसे होऊ शकतात. परिवार म्हणून काळजी करा त्यामुळे अनिल देशमुख यांची काळजी करण्याऐवजी वानखेडेंची काळजी करत आहेत. वानखेडेंच्या मागे समाज पूर्णपणे ठाम उभा आहे. भाजप अन्यायाचा संघर्ष करणाऱ्यांसाठी ठाम उभा राहणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : १०० कोटी वसुली प्रकरण: ‘नॉट रिचेबल’ माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -