घरमहाराष्ट्रChandrapur News: मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये 100 जणांना अन्नविषबाधा, एकाचा मृत्यू

Chandrapur News: मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये 100 जणांना अन्नविषबाधा, एकाचा मृत्यू

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात सामूहिक भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवण झाल्यानंतर तब्बल 100 जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमधील एकाचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात महाप्रसादातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमात सामूहिक भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. जेवण झाल्यानंतर तब्बल 100 जणांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमधील एकाचा मृत्यू झाला आहे. रामप्रेक्ष यादव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Chandrapur News Big News 100 people get food poisoning in Chandrapur one died)

समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती ताल्युक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. भोजनानंतर 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या नागरिकांना या परिसरात असलेल्या वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय तसंच स्थानिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांच्या तब्येतीबाबत माहिती घेतली. पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेतली नाही

सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषधं प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं सांगितलं. तसंच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी जात असून नेमकं कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, असंही सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -