घरताज्या घडामोडीउमेदवारी मिळाली असती, तर लाखभर मतांनी जिंकलो असतो - बावनकुळे

उमेदवारी मिळाली असती, तर लाखभर मतांनी जिंकलो असतो – बावनकुळे

Subscribe

भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी देताना एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या ज्येष्ठांना नाकारून तरूण आणि इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे या चौघांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. त्यापैकी एकनाथ खडसेंनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली आहे. मात्र, विदर्भातील नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र नाराज नसल्याचं सांगितलं आहे. ‘विधानसभेच्या वेळी माझ्यावर प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. ती मी पार पाडली. विधानपरिषदेची उमेदवारी तरूण उमेदवारांवर सोपवण्यात आल्याचं माध्यांमधून समजलं. गेल्या २८ वर्षांपासून मी पक्षाचं काम करतोय. एखाद्या घटनेवरून असं म्हणता येणार नाही की आपल्यावर अन्याय झालाय. मी पक्षाची वाट पाहातोय. पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती पार पाडेन’, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

..पक्षाला उपयुक्तता वाटली, तर संधी मिळेल

दरम्यान, यावेळी बावनकुळेंनी पुढे संधी मिळण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. ‘मी तीन वेळा मोठ्या फरकाने जिंकून आलो आहे. यावेळी उमेदवारी दिली असती, तर एक लाखाच्या मतांनी जिंकून आलो असतो. पण पक्षाने माझ्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवली होती. चंद्रशेखर बावनकुळेंसाठी आम्ही दु:खी आहोत. त्यांच्यावर अन्याय झाला, हे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलं. त्यामुळे जर पुढे पक्षाला वाटलं की माझी विधानसभेत किंवा विधानपरिषदेत उपयुक्तता आहे, तर तिथे पाठवतीलच’, असं ते म्हणाले. ‘एकनाथ खडसेंना चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाण्याबद्दल सांगितलं होतं. खडसे म्हणाले होते की विधिमंडळात काम करायचं आहे. मी काही तसं सांगितलं नव्हतं. पक्षाला माझी जिथे उपयुक्तता वाटते, तिथे मी काम करेन’, असं देखील त्यांनी नमूद केलं.

- Advertisement -

मला कुणाचीही ऑफर नाही..

यावेळी आपल्याला कोणत्याही दुसऱ्या पक्षाने ऑफर दिलेली नाही, असं बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं. ‘मी कधीही कोणत्याही पक्षाकडे गेलो नाही, मला कुणीही फोन केला नाही, मला कुणीही ऑफर दिलेली नाही. काही चर्चा असतील. पण मला कुणीही अजून तसं काही म्हटलेलं नाहीट, असं ते म्हणाले. तसेच, ‘तिकीट न दिल्याबद्दल किंवा डावलल्याबद्दल कधीही पक्षाकडे चर्चा केलेली नाही. या विषयावर पंकजा मुंडे किंवा खडसेंसोबतही माझी काहीही चर्चा झालेली नाही, असं बावनकुळेंनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -