घरमहाराष्ट्रनागपूरChandrashekhar Bawankule: कधीही काहीही घडू शकतं; बावनकुळे का म्हणाले असं?

Chandrashekhar Bawankule: कधीही काहीही घडू शकतं; बावनकुळे का म्हणाले असं?

Subscribe

नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, भविष्यात आत्मनिर्भर भारत होईल अशी गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला आहे

नागपूर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केलेल्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता कधी काहीही घडू शकतं असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. (Chandrashekhar Bawankule Anything can happen anytime Why did Bawankule say that)

नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, भविष्यात आत्मनिर्भर भारत होईल अशी गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला आहे. त्यामुळेच संपूर्ण देशभर मोदींच्या नावाने तिसऱ्यांदा सरकार येईल असंच वारं सध्या देशभर दिसते. राहुल गांधी जिथे- जिथे जातील तेथे त्यांना मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा ऐकू येतील. कारण, मागील दहा वर्षांत मोदींनी देश बदलला आहे. गरीब, मध्यमवर्गीयांचं कल्याण पंतप्रधानांनी केलं आहे. त्यांमुळे देशातील जनता मोदी यांच्याच पाठीशी आहे.

- Advertisement -

भाजप पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेऊन त्यांना साथ देण्याकरिता अनेकजण भाजपमध्ये येण्याची तयारी करतायेत. काहीजण तयारीत आहेत तर काही जण पुढील काळात तयारी करतील. परंतु तुमच्याकडे जी माहिती आहे ती माझ्याकडे सध्या तरी नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकते. मोदींना साथ देण्यासाठी कुणीही येऊ शकतं. त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा तयार आहे. असं सूचक विधान त्यांनी केलं.

हेही वाचा : Vijay Wadettiwar : नितेश राणेंचा व्हिडीओ ट्वीट करत वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा; राणेंकडूनही पलटवार

- Advertisement -

जयंत पाटील यांच्याविषयी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझी आणि जयंत पाटील यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. त्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी आतापर्यंत कुणाशीस चर्चा केली नाही. नुसत्या या वावड्या उठवल्या जात आहेत. पण तरीही मोदींना साथ देण्याकरिता, मोदींनी दिलेल्या गॅरंटीला पूर्ण करण्यासाठी जर कुणी भाजपमध्ये येत असेल तर त्यांचं भाजपमध्ये स्वागत आहे. भाजपमध्ये स्पेस आहे. आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही. पण आमच्या विचारावर, पक्षाच्या विचारधारेवर काम करावं लागतं अशी ज्यांची तयारी असेल त्यांना आम्ही कधीही पक्षात घेऊ. परंतु कुणाची विश्वासहार्यता धोक्यात येईल असं विधान मी करणार नाही. जयंत पाटील भाजपमध्ये कुणाच्या संपर्कात आहेत हे मला माहिती नाही. परंतु ते सध्या तरी माझ्या संपर्कात नाहीत. एवढे मी नक्की सांगू शकतो असेही यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा : Varun Dhawan : वरुण धवन होणार बाबा, नताशाच्या बेबी बंपचा फोटो केला शेयर

भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याने भाजपमधील काहीजण नाराज आहेत असे विचारले असताना त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रप्रथम या विचारधारेवर काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भाजपमध्ये कुणीही आले तरी ते नाराज होत नाहीत. एखाद्या कार्यकर्त्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यास त्याची नाराजी दूर करुन तो पुन्हा कामाला लागतो असेही चंद्रशेख बावनकुळे यावेळी म्हणाले. आमच्याकडे फार काही असंतोष निर्माण होत नाही. तर नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता बानकुळे म्हणाले की, आमदार नितेश राणे काय म्हणाले हे मी तपासून बघेन. विजय वडेट्टीवारांबाबतही विचारले असता ते म्हणाले त्यांनी अद्याप त्यांनी कुठलाही संपर्क केला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -