घरमहाराष्ट्रराजकीय पक्षाने निवडणुकीसाठी नेहमी तयार राहावं लागत, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी नेहमी तयार राहावं लागत, छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य

Subscribe

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानसभा बरखास्तीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. शिंदेच्या बंडखोरीमुळे आता महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात असल्याची भीती व्यक्त होतेय. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ट्विटममुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. राऊतांनी आपल्या ट्विटमधून अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहे.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी नेहमी तयार राहावं लागतं, असं सुचक विधान केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आता एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी मंत्री छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, निवडणुका लागू दे, उद्या लागू दे नाही तर परवा लागू दे, राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी नेहमी तयार रहावं लागतं. असं कधी होईल वाटलं नव्हत पण अचानक काय झालं माहित नाही.

- Advertisement -

शरद पवारांची भेट घेणार असून ते यावर काय करतात? काय मार्ग निघतो का? यावर लक्ष देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहमध्ये तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. आता किती संख्या बळ आहे ते काय आहे ते बघू….हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेत आहे. असही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

काय होत ते बघूया ना. सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं, नवीन पद्धतीने लढणं, परत निवडणुक लढून मताधिक्य आणणं या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत आणि पवारांनाही त्या नवीन नाहीत, अस देखील भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानसभा बरखास्तीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. शिवसेनेकडूनच सरकार बरखास्तीचे ट्विट समोर येत आहे. तर दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे, दरम्यान भाजपकडून देखील बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून हे निश्चित होत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आता भाजपच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी संख्याबळ जमा करत आहे.


बंडाच्या ४८ तासाआधी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये तू तू मैं मैं

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -