घरमहाराष्ट्रChhagan Bhujbal : बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या...

Chhagan Bhujbal : बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या टकराऐगा…; भुजबळ यांचा मनोज जरांगेना इशारा

Subscribe

बीड : गोरगरिबांच्या हक्काचे आरक्षण वाचवणे तुमचं आमचं काम आहे. यासाठी आम्ही कायदा हातात घेणार नाही. मात्र संविधानाने दिलेला अधिकार गाजवणार. त्यामुळे बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या टकराऐगा, जोजो हमसे टकराऐगा वो मिट्टी मे मिल जाएगा, अशा इशारा छगन भुजबळ यांनी मनाजे जरांगे यांचे नाव न घेता त्यांना दिला. आज बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते. (Chhagan Bhujbal Son leave this talk of weapons what will happen to us Manoj Jarangena gesture of Chhagan Bhujbal)

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण कदापिही मिळणार नाही. या अगोदर अनेक आयोगांनी ते सामाजिक दृष्ट्या मागासलेले नाही हे सिद्ध केले आहे, मात्र त्यांना आरक्षण देण्यास विरोध दर्शविलेला आहे. आता मात्र ओबीसी आयोग हे मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ मराठा समाजासाठी काम करतोय का? हा आयोग ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग आहे? असा सवाल उपस्थित केला. तसेच देशाच्या मुख्य न्यायमूर्तींचा पगार 2 लाख 80 हजार आणि इकडे आयोगाच्या न्यायाधीशांना 4 लाख 80 हजार एवढा पगार दिला जातो आहे. हा प्रकार नेमका काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसींच्या प्रश्नावर आपण सरकारमध्ये तर बोलतच आहोत आणि इथेही बोलणार अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : कौस्तुभ धवसेंच्या परदेशवारीवर 1 कोटी 88 लाखांची उधळपट्टी; फडणवीसांचे आहेत OSD

मनोज जरांगे यांचे नाव न घेता छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यावेळी देखील कोणी नाशिक बंद करण्याचे आदेश दिले नाही. मात्र त्यांच्या सभा असल्या की शाळांना सुट्टीचे आदेश दिले जातात, अशी टीका त्यांनी केली. भुजबळांना पाहून घेऊ अशा धमक्या दिल्या जातात. त्यांना मला सांगायचे आहे की, बेटा छोड दे ये हतियारो की बात, हमसे क्या टकराऐगा, जोजो हमसे टकराऐगा वो मिट्टी मे मिल जाएगा, असे असा इशारा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला.

- Advertisement -

छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार फक्त एवढंच म्हणाले की, मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नये, एवढीच काळजी घ्या. मात्र त्यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषा वापरली गेली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत किती घाणेरडी भाषा वापरली गेली. इतका असंस्कृतपणा? एवढी मस्ती कुठून आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा –Uddhav Thackeray : राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरून ठाकरे आक्रमक; BJP वर निशाणा साधताना म्हणाले…

गोरगरिबांच्या हक्काचे आरक्षण वाचवणे तुमचं आमचं काम आहे. यासाठी आम्ही कायदा हातात घेणार नाही. मात्र संविधानाने दिलेला अधिकार गाजवणार, असा इशारा देत छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही पेटविनारे नाही पेटवणारे आहोत, आम्ही तोडणारे नाही घडवणारे आहोत. आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध पिलेलो नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ते म्हणाले की, समाजाने दबाव निर्माण केला पाहिजे. आज ओबीसी संकटात आहे. त्यासाठी दलित आदिवासी बांधव एकमेकांना साथ देत आहेत. एकत्र येऊन लढले पाहिजे असे सांगत जिते वही है जो शेर होते है, बाकी सब मिट्टी के ढेर होते है या शायरीने सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

भुजबळांनी मुस्लिमांचा केला जाहीर सत्कार

क्षीरसागर कुटुंबियांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी वसीम शेख, जलील अन्सारी, सत्तार शेख, अझीम शेख यांनी त्यांना वाचवलं. आपली धार्मिक प्रार्थना बाजूला ठेवून त्यांनी हे माणुसकीचे काम केले. याबद्दल आज ओबीसी मेळाव्याच्या मंचावरून त्या सर्वांचा जाहीर सत्कार केला. यावेळी राजमाता जिजाऊ मा साहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त वंदन केले. तसेच आपल्या हॉटेलची जाळपोळ होऊन देखील ओबीसींच्या लढ्यात योगदान देत असलेल्या सुभाष राऊत यांचं खास कौतुक करत यापुढील काळातही आपले काम सुरू ठेवावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -