घरमहाराष्ट्रआज आमच्या विरोधात जे रसद पुरवत आहेत, त्यांना आम्ही...; Chhagan Bhujbal यांचा...

आज आमच्या विरोधात जे रसद पुरवत आहेत, त्यांना आम्ही…; Chhagan Bhujbal यांचा रोख कोणाकडे?

Subscribe

बीड : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लावला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. जसे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार काम करत आहे, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही सरकारची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज बीड येथील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ओबीसी भटके विमुक्त महाएल्गार सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते. (We will not forget those who are providing logistics against us today Who has Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Ram Mandir : शंकराचार्यांवरील ‘त्या’ वक्तव्यानंतर नारायण राणे यांचे अवघ्या तासाभरात घुमजाव; म्हणाले…

- Advertisement -

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. पण ओबीसींच्या नशीबी हे दुर्दैव आले आणि ओबीसींच्या संकटांची मालिका सुरू झाली. या विरुद्ध आपल्याला लढावे लागणार आहे. गेली दोन-तीन महिने आंदोलन सुरू होते. आपल्या विरोधात खालच्या पातळीवर शिवीगाळ सुरू होती. तरी देखील आपण काहीही बोललो नाही. मात्र बीड पेटले, आमदारांचे घरे, कार्यालये जाळली गेली. सुभाष राऊत यांचं हॉटेल जाळले गेले. हे सर्व अचानक झाले नव्हते, तर प्लॅन करून सर्व घडविण्यात आले. याविरुद्ध आपण गप्प बसायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

छगन भुजबळ म्हणाले की, इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले. इतिहासात हेच नमूद आहे की, छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते मावळे म्हणजे भटके विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार समाजाचे होते. पण आता छत्रपतींचे नाव घेऊन आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. छत्रपतींसाठी जीवाची बाजी लावून लढवणाऱ्यांचीच आज घरे पेटवता तुम्ही? त्यांची लायकी काढता? असेही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : कौस्तुभ धवसेंच्या परदेशवारीवर 1 कोटी 88 लाखांची उधळपट्टी; फडणवीसांचे आहेत OSD

आरक्षणासाठी जे लोक आंदोलन करत आहेत. त्यांना काही लोक रसद पुरवत आहेत. काही लोक शांत आहेत. जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण जे आमच्या विरोधात काही लोकांना शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. हे जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. तसेच आमची किंमत काय आहे ते येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

राज्यात वातावरण बिघडविण्याचे आरोप आमच्यावर केले जाताय. त्यांना सांगायचं आहे की आम्ही जाळपोळ केली नाही, कुणाला मारहाण केली नाही, दादागिरी केली नाही असा सवाल उपस्थित केला. ज्या वकिलांनी कुठलीही फी न घेता जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना जामीन मिळवून दिला त्यांचा सत्कार हे करता आहे. अगदी सरकारने गुन्हे दाखल करू नये असे इशारे देत आहे. त्यातून यामागे कोण आहे हे सर्वांना समजले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच जालना जिल्ह्यात 200 हून अधिक गावठी कट्टे आले, अगदी पाच हजारात विक्री झाली, जे आंदोलन करता आहे. त्यांच्या आंदोलनात देखील बंदुका घेऊन लोक सहभागी झाले, मात्र पोलिसांकडून कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित करून पोलिसांनी यावर कडक कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा – मोदींकडून विकासकामांचे उद्घाटन, मात्र Aaditya Thackeray यांचा पुण्यातील ‘या’ मुद्द्यावरून सरकारवर निशाणा

दरम्यान, बीडमध्ये पार पडलेल्या सभेत छगन भुजबळ यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, नारायणराव मुंडे, प्रा. लक्ष्मण गायकवाड, शब्बीर अन्सारी, समीर भुजबळ, प्रा. टी. पी. मुंडे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, कल्याण दळे, दौलतराव शितोळे, सचिन साठे, चंद्रकांत बावकर, डॉ. स्नेहा सोनकाटे, डॉ. सुदर्शन घेरडे, प्रा. पी. टी. चव्हाण, ॲड. सुभाष राऊत यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -