घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरऔरंगाबादमध्ये धावणार मेट्रो; 6 हजार 800 कोटींच्या खर्चासह अंतिम आराखडा तयार

औरंगाबादमध्ये धावणार मेट्रो; 6 हजार 800 कोटींच्या खर्चासह अंतिम आराखडा तयार

Subscribe

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या समोर या मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण उद्या दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरातील नागरिकांचा प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्याप्रमाणेच आता औरंगाबाद शहरात सुद्धा मेट्रो धावणार आहे. दरम्यान या मेट्रोचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे. औरंगाबाद इथल्या मेट्रोच्या प्रवासासाठी तब्बल 6 हजार 800 कोटी रुपये एवढा खर्च येणार असल्याचे अपेक्षित आहे. ( Metro will run in Aurangabad; 6 thousand 800 crores with the final plan prepared )

औरंगाबाद मेट्रो प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. 6 हजार 800 कोटी रुपये एवढा खर्च या मेट्रो प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या समोर या मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण उद्या दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वाळूंज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी या मार्गाचे काम केले जाणार आहे.

- Advertisement -

नागपूर, मुंबई, पुण्यासारखे औरंगाबाद शहराचा देखील विस्तार होत आहे त्याचप्रमाणे अधिक प्रमाणात वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील दळणवळणावर त्याचा ताण येत आहे. दळणवळणावर येणारा ताण कमी व्हावा म्हणून औरंगाबादमध्ये मेट्रो प्रकल्प होणार आहे. दरम्यान शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात केली होती. अशातच याच पुलावर साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर पूल बांधून या ठिकाणी मेट्रो प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. या पूलासाठी 3 हजार 600 कोटी तर मेट्रोसाठी 3 हजार 200 कोटी असा एकूण 6 हजार 800 कोटी रुपये खर्च या प्रकल्पासाठी येणार आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये मेट्रो झाल्याने त्याचा फायदा शहरातील नगरिकांना होणारच आहे त्यासोबतच वाळूज एमआयडीसी शेंद्रा डीएमआयसी येथील कामगार आणि प्रवाशांनासुद्धा होणार आहे. औरंगाबादचा वेगाने विस्तार होत आहे. औरंगाबादमध्ये अनेक नामांकित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत अशातच या शहरात मेट्रो झाली तर त्याचा फायदा शहरातील विकासात लागेल. दरम्यान या मेट्रोमुळे ऑरिक सिटी या नव्या शहरापर्यन्त देखील नागरिकांचा प्रवास सहज, सोपा होणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –   ”राज्य सरकारचा लवकरच अंत होणार”; नाना पटोलेंचा दावा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -