घरमहाराष्ट्रसभा घेण्यामध्ये मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये; देशभरात घेतल्या ९१ सभा

सभा घेण्यामध्ये मुख्यमंत्री पहिल्या पाचमध्ये; देशभरात घेतल्या ९१ सभा

Subscribe

देवेंद्र फडणवीस...राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपाचे नंबर एकचे मंत्री..मात्र आता महाराष्ट्रात नंबर एक स्थानावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील नेत्यांमध्ये देखील पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. तेही जाहीर सभा घेऊन.

खरंतर लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपला असून, आता रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान देखील पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता असणार आहे ती 23 मे म्हणजे निकालाच्या दिवसाची. मात्र या संपूर्ण निवडणूक काळात एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे राजकिय नेत्यांनी उडवलेल्या प्रचार सभांचा धुराळा. देशातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील प्रचाराच्या सभानी वातावरण निर्मिती केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दोन नव्हे तर राज्यात एकूण 78 आणि इतर राज्यात 13 अशा मिळून देशभरात तबबल 91 जाहीर सभा घेतल्याची माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या क्रमांकांवर अमित शहा असून 161 जाहीर सभा आणि 18 रोड शो, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असून, त्यांनी 142 जाहीर सभा आणि 4 रोडशो, तिसऱ्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ 135 जाहीर सभा, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर 109 सभा घेतल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभरात 91 सभा घेतल्या.

- Advertisement -

म्हणून मुख्यमंत्र्यांच्या राज्यात सर्वाधिक सभा 

2014 ची निवडणुक ही मोदी या एका नावावर लढवली गेली होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकी अगोदर मोदींची लाट ओसरल्याचे पहायला मिळत होते. त्यातच शिवसेना-भाजपामधील मागील चार वर्षांचा अंतर्गत वाद यामुळे युती होऊनही दोन्ही पक्ष्याच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे पहायला मिळाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून जिथे शक्य असेल तिथे सगळीकडे जाहीर सभा घेतल्या. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इतर दिगगज नेते हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अडकल्यामुळे सभांचा सर्व भार हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांसाठीही घ्याव्या लागल्या सभा 

फक्त भाजपाच्या उमेदवारासाठी नाही तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना सभा घ्याव्या लागल्या. मुंबईमध्ये तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासाठी खास जाहीर सभा ठेवली होती. तसेक जिथे सभा घेणे शक्य नाही अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बाईक रॅली असेल किव्हा रोड शो देखील केल्याचे पहायला मिळाले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे देशभरामध्ये जो सभांचा झंझावात झाला त्यामध्ये मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा पहिल्या पाचमध्ये नंबर लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -