घरCORONA UPDATEसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा आणि आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा आणि आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

याबाबत स्वत: ट्विट करुन दिली माहिती .

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा आणि नोएडाचे भाजपचे आमदार पंकज सिंह यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली. त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्यांना आयसोलेट राहण्याची आणि कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांसह, यूपी सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. योगी सरकारचे दोन मंत्री चेतन चौहान आणि कमल राणी वरुण यांचेही संसर्गामुळे निधन झाले आहे.

- Advertisement -

ट्विटवर माहिती देताना नोएडाचे आमदार पंकज सिंह म्हणाले की, कोरोनाची लक्षणं दिसताच त्यांनी कोरोनाची चाचणी केली असून मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल असल्याचे त्याने सांगितले. तसेच जे त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून त्यांनी देखील कोरोना टेस्ट करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी लोकांना केली.

दरम्यान, मंगळवारी राज्य सरकारचे मंत्री जी. एस. धर्मेश यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. जी. एस. धर्मेश योगी हे सरकारमधील समाज कल्याण राज्यमंत्री आहेत. याशिवाय आमदार हेमलता दिवाकर यांनाही कोरोनची लागण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेशात कोरोनाचा कहर सुरू असून गेल्या २४ तासांत कोविड -१९ मुळे आणखी ५७ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तर यावेळी, ५,५७१ नवीन लोकांना कोरोना संक्रमण झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.


ब्लड टेस्टवरून होणार मनोविकाराचे निदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -