घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिडको कार्यालय प्रश्नी सत्ताधारी आमदार, खासदारांवर कोणाचा दबाव?; भुजबळांचा सवाल

सिडको कार्यालय प्रश्नी सत्ताधारी आमदार, खासदारांवर कोणाचा दबाव?; भुजबळांचा सवाल

Subscribe

नाशिक : नाशिकमधील महत्वाची कार्यालये बंद केली जात आहेत. अलीकडे कधी हे ऑफीस गेले, ते ऑफीस गेले कधी विमानसेवाच बंद पडली, अरे हे चाललयं तरी काय, शहरात भाजपचे आमदार आहेत, मुख्यमंत्री गटाचे खासदार आहेत हे लोक काय करताहेत असा सवाल करत यामागे कुणाचा दबाव आहे असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. आगामी अधिवेशनात सिडको कार्यालयाबाबत आवाज उठवणार असून आमदारांची इच्छाशक्ती असेल तर माझ्यासोबत उभं राहावं असे आवाहन भुजबळांनी केले.

मागील काही दिवसापासून सिडको प्रशासकीय कार्यालयाचा वाद पेटला आहे. शासनाने सिडकोचे नाशिक मधील कार्यालय बंद करण्याचा आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सिडको परिसरातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकवटले असून नागरिकांना सोबत घेत या निर्णयाच्या विरोधात प्रसंगी मोठ जनआंदोलन उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. याबाबत आता छगन भूजबळ यांनीही आपली भूमिका मांडत, नाशिक मधील प्रकल्प पळवले जात असल्याचा आरोप करताना सिडको कार्यालय नाशकतच राहिले पाहिजे त्याचे कामकाज जसे सुरू होते त्याच पद्धतीने सुरू ठेवले पाहिजे अशी मागणी केली आहे. तब्बल ६० हजार मिळकत धारकांचा हा प्रश्न आहे. औरंगाबादच्या सिडकोसाठी तेथे कार्यालय आहे त्या कार्यालयात औरंगाबादचे कामकाज चालू द्यावे उगाच नाशिकचाही भार त्या कार्यालयावर का टाकायचा, तसेच जरी सिडकोने बर्‍याच गोष्टी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या असल्या तरी आजही अनेक कामांसाठी नागरिकांना सिडको कार्यालयातच जावे लागते. त्यामुळे कार्यालय हलवू नये असे म्हणत हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही भूजबळ यांनी सांगितले.

- Advertisement -
सत्ताधारी आमदार-खासदारांवर कोणाचा दबाव

यावेळी बोलताना भूजबळ यांनी सत्ताधारी आमदार खासदार यांच्यावर दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “विशेष म्हणजे नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत, सिडकोतही भाजपचे आमदार आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता होती. येथील खासदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाचे आहेत. मग सरकार यांच असतांना खासदार, आमदार एक शब्दही बोलायला तयार नाही. मुळात त्यांची इच्छाशक्ती आहे का हे थांबवायची, की यामागे काही राजकारण किंवा अर्थकारण आहे?, सिडकोचा कारभार असलेल मंत्रालय मुख्यमंत्रयांकडेच आहे त्यामुळे मुख्यमंत्री, तसेच तीन आमदार आणि महानगरपालिकेत सत्ता दिलेल्या भाजपाच्या उपमुख्यमंत्रयांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे” सिडको कार्यालय प्रश्नी असा टोला भुजबळ यांनी सत्ताधार्‍यांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -