घरमहाराष्ट्रनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजाला चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्मकार समाजाला चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न

Subscribe

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. कालच महाराष्ट्रातील २१ महामंडळे आणि प्राधिकारण्याच्या अध्यक्षपदी भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांची नेमणूक केल्यानंतर आता चर्मकार समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात लवकरच चर्मकार आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळ येथे संत रोहिदास भवन भूमीपूजन क्रार्यक्रमात केली.

चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी चर्मकार आयोग तयार करणार आहोत. या अयोगासाठी वाट्टेल तेवढा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी घोषणाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ‘सबका साथ, सबका विकास’ हे भाजपचे घोषवाक्य संत रविदास यांच्या समतेच्या मूळ विचारातूनच घेतले असल्याचेही फडणवीस म्हणाले. समतेचे राज्य प्रस्थापित झाले पाहिजे हे ज्यांनी बिंबवले त्यांची प्रेरणा समाजाला मिळावी यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. भाजप सरकार संत रोहिदास यांच्याबाबतीत सकारात्मक असल्यानेच आमच्या काळातच संत रोहिदास भवनाच्या कामाला वेग आला, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

चर्मकारांच्या जात पडताळणीचा अडसर दूर

चर्मकार समाजातील अनेकांना जात पडताळणीचा दाखला मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे रक्ताचे नाते असल्यास जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी इतर कुठलीही कागदपत्रे लागणार नाही, असा निर्णय आमच्या सरकारने घेतला. तसेच चर्मकार समाजाला रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महापालिकेच्या परवानगीने टपरी-शेड बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय लवकरच सरकार काढणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -