घरमहाराष्ट्रघटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं...; मुख्यमंत्री शिंदेंची मविआवर टीका

घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं…; मुख्यमंत्री शिंदेंची मविआवर टीका

Subscribe

घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं कालबाह्य ठरवलं आणि चांगलीच चपराक दिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआला लगावला आहे.

सरकार कोसळणार असं म्हणत काही लोक मागच्या अनेक दिवसांपासून मुहूर्त काढत होते. परंतु, ज्यांच्या पाठीशी या राज्यातील हजारो, लाखो सामान्य माणसांचा, माता भगिनींचा आशीर्वाद आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मविआवर हल्ला चढवला. घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयानं कालबाह्य ठरवलं आणि चांगलीच चपराक दिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआला लगावला आहे. शासन आपल्या दारी या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातून केली, यावेळी ते बोलते होते. ( CM Eknath Shinde Criticized MVA over Maharashtra political crisis result )

मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेला माहित आहे की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज जे माझं भव्य दिव्य स्वागत झालं, ते सर्वसामान्य जनतेचं व्हावं, असं मला वाटतं. गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला आणि आज हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही माझं हे जे जंगी स्वागत केलंत, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभुराज देसाईंचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार 

राज्यात स्थापन झालेलं सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. 75 वर्षांची वयोवृद्ध माता तिलादेखील विश्वास आहे की राज्याचा मुख्यमंत्री मला भेटू शकतो, मी त्याच्याशी बोलू शकते. हा विश्वास निर्माण करण्याचं पुण्य आणि भाग्य मला मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विश्वास निर्माण करण्यासाठी खपावं लागतं, झिजावं लागतं आणि हा तुमचा एकनाथ सकाळी उठल्यापासून ते पहाटे 4, 5 पर्यंत लोकांना भेटत असतो, म्हणून लोकांना विश्वास निर्माण झाला आहे की हे आपलं सरकार आहे. सामान्य जनतेला विश्वास आहे की, हे सरकार आम्हाला न्याय देणार आहे, असं शिंदे यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: कर्नाटकात काँग्रेसच्या मोठ्या आघाडीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… )

- Advertisement -

…आता सरकार तुमच्या दारी 

आधी एक म्हण होती, सरकारी काम आणि सहा महिने थांब. परंतु आता हे चित्र बदललं आहे. आता सरकार तुमच्या दारी आहे. सर्वसामान्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आता एका छताखाली मिळणार आहेत.  तसचं, या सरकारने सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी विशेष योजना राबवल्या. महिलांना एसटीच्या तिकीटात 50 ट्कके सवलत दिली आहे. तर मुलींसाठी लेक लाडकी सारखी योजनाही आणल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -