घरताज्या घडामोडीकाही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Subscribe

काही लोक सर्वोच्च न्यायालयालाच जर मार्गदर्शन करायला आणि सल्ले द्यायला लागले तर त्यावर मी काय बोलू शकतो', अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता पलटवार केला.

काही लोक सर्वोच्च न्यायालयालाच जर मार्गदर्शन करायला आणि सल्ले द्यायला लागले तर त्यावर मी काय बोलू शकतो’, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेवदंडा येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray)

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

- Advertisement -

“हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आम्ही न्यायप्रीय लोक आहोत. न्यायदानावर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत घटना, कायदा नियम असून त्याचे पालन करणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असले. काही लोक सर्वोच्च न्यायालयालाच जर मार्गदर्शन करायला आणि सल्ले द्यायला लागले तर त्यावर मी काय बोलू शकतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी

- Advertisement -

16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. सगळ्या घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाही, मात्र सदस्य आपात्रतेचा निर्णय आधी झाला पाहिजे. त्याआधी निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेने बनवलेल्या घटनेनुसार पक्षातील निवडणूका होतात. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली ती मिळालेली नाही. या घटनेनुसारच शिवसेना पदाधिकारी आणि पद निर्माण केली गेली आहेत त्याच्या उल्लेख त्याच नमुद आहे, शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाचं आम्हाला मान्य नाही असं सांगितलं, त्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

न्यायालय ठाकरेंचे का ऐकेल? – मंत्री दीपक केसरकर

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडावे. मात्र, ते न करता ठाकरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काय वाटत हे महत्त्वाचे नाही. सर्वोच्च न्यायालयाने असे कोणतेही आदेश दिले नाहीत. न्यायालय किंवा निवडणूक आयोग उद्धव ठाकरे यांचे म्हणणे का ऐकेल? त्यांची सुरू असलेली ही सगळी धडपड व्यर्थ आहे, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

मी पंतप्रधानांशी ठाकरे यांची भेट घडवून आणली. त्यावेळी चूक दुरुस्त करायची संधी होती. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, असा दावाही केसरकर यांनी केला. पुढे ते म्हणाले की कुटुंबावर जे काही आरोप झाले त्याने ते दुखावले गेले असतील. पण दुखावले गेले म्हणून असे वागणे चुकीचे होते. जे ठरले होते ते त्यांनी केले नाही, त्याप्रमाणे भूमिका घेतली नाही. आजसुद्धा तुम्ही सांगा की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा आम्ही सगळे मुंबईला येऊ असे मी त्यावेळी सांगितले होते


हेही वाचा –  आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक प्रकरणात औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -