बोरिवलीच्या योगी नगरमधील झोपडपट्ट्यांना भीषण आग

मुंबईतील बोरिवली येथील योगीनगर परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील बोरिवली येथील योगीनगर परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस घटनास्थळी आणि अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. (Fierce fire engulfs slums in Borivali Yogi Nagar in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीमधील योगीनगर परिसरात असलेल्या विचारे कंपाऊंडमधील झोपडपट्ट्यांना आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये विचारे कंपाऊंडमधील झोपडपट्ट्या आगीच्या भक्षस्थानी असून, झोपडपट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच, या परिसरातील स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. शिवाय, अग्निशमन दलाचे जवान व स्थानिक पोलीस आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

या आगीतील जीवितहानीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र झोपडपट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या झोपडपट्टीला आग लागली आहे. त्या झोपडपट्टीच्या बाजूला अनेक चाळी आहेत. त्यामुळे ही आग पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.


हेही वाचा – काही लोक सर्वोच्च न्यायालयाला सल्ले द्यायला लागले; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार