घरताज्या घडामोडीमुंबईत कुठेही पाणी साचलेले नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

मुंबईत कुठेही पाणी साचलेले नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

Subscribe

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) कुठेही पाणी साचले नाही. सकाळपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ज्या ठिकाणी रेड अलर्ट (Red Alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orenge Alert) दिलेला आहे, ठिकाणी पाऊस जास्त होता.

‘मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) कुठेही पाणी साचले नाही. सकाळपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ज्या ठिकाणी रेड अलर्ट (Red Alert) आणि ऑरेंज अलर्ट (Orenge Alert) दिलेला आहे, ठिकाणी पाऊस जास्त होता. पण आता पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे पुरपरिस्थिती जी निर्माण होत होती. ती आता कमी होत चालली आहे. पालक सचिवांनाही त्या-त्या जिल्ह्यांमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून सर्व मदतीचा पुरवठा करता येईल. नागरिकांना कोणताही त्रास आणि गैरसोय होणार नाही, याची काळजी घेता येईल. त्यामुळे सर्व सुरक्षा यंत्रणा ठिक-ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (CM eknath shinde talks on maharashtra rain)

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिली. अधिकाऱ्यांकडून पावसाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, तिकडच्या नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आले आहे. त्यानुसार जवळपास ३ हजार ५०० नागरिकांना सुरक्षास्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, दरड कोसळणाऱ्या भागातीलही नागरिकांनी सुरक्षस्थळी हलवण्यात आले आहे. त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

रायगड आणि रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याठिकाणीही सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. मुंबईत जवळपास २०० ठिकाणी पाणी साचले होते. पण आता पाणी ओसरले आहे. मागील काही वर्षांपासून महापालिकेने केलेल्या कामांमुळे आता पाणी कमी साचत आहे. रेल्वे स्थानकातही ठिक-ठिकाणी पंप लावण्यात आले आहे. पाणी साचण्याच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. नागरिकांना कोणतीही सुरक्षा कमी पडू नये याची काळजी घेतली आहे. शिवाय, रेल्वे वाहतूक बंद पडल्यास रस्ते वाहतुकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेची बेफिकरी; अपघातांना आमंत्रण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -