घरताज्या घडामोडीमुंबईकरांना मोठा दिलासा ! १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल...

मुंबईकरांना मोठा दिलासा ! १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवेश – मुख्यमंत्री

Subscribe

रुग्ण वाढीचा वेग आणि रुग्णालयातील बेडची संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसवंतांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा नागरिकांना १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. तसेच जर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार असल्याचा इशारा मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे जिथे जिथे शिथिलता देण्यात आली आहे. तेथे कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मुंबईतील ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १५ ऑगस्टपासून पहिल्या टप्प्यात लसवंतांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईमध्ये लोकल प्रवास सुरु करतो आहोत. आपल्या स्वातंत्र्य दिनापासून सुरु करत आहोत. मात्र तो करताना पहिल्या टप्प्यात ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले तसेच ज्यांना लस घेऊन १५ दिवस झाले आहेत त्यांच्यासाठी मुभा देण्यात येत आहे. यासाठी अॅप तयार केला आहे. या अॅपमध्ये आपली माहिती नोंदवायची आहे. ते केल्यावर आपल्याला एक पास येईल. तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयात जाऊन पास घ्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

..तर लॉकडाऊन करण्यात येणर

राज्यात आणि मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने उत्तम काम केले आहे. यामुळे मुंबई मॉडेलचे कौतुक जागतिक पातळीवर होत आहे. मात्र याचे श्रेय हे राज्य सरकारचे नसून सर्वसामान्य जनतेचे आहे. राज्यात कोरोना आटोक्यात आला असल्यामुळे काही प्रमाणात शिथिलता आपण देत आहोत. परंतू एक साधारण तिसरी लाट आलीच तर रुग्ण वाढ झाली तर, रुग्ण वाढीचा वेग आणि रुग्णालयातील बेडची संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात येणार असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसचे जर नियम पाळले नाही तर लक्षात घ्या कोविड अजून गेला नाही. कोरोनाला आमंत्रण दिले जाईल असे करु नका आपल्या हातात आहे की, कोरोना कसा उलथवायचा असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -