घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी बोलावली न्याय विभागाची बैठक; गृह खात्याचे मोठे अधिकारी राहणार हजर?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली न्याय विभागाची बैठक; गृह खात्याचे मोठे अधिकारी राहणार हजर?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी न्याय विभागाची समिक्षा बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृह खात्याचे मोठे अधिकारी हजर राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त तसंच गृहविभाचे सचिव देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं गांभीर्याने घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक न्याय विभागाची समिक्षा बैठक असली तरी या बैठकीला गृह खात्याचे मोठे अधिकारी उपस्थित असणार आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्रावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी ही समिक्षा बैठक बोलावली असल्याचं समोर येत आहे. ही बैठक सह्याद्रीवर होणार असल्याची शक्यता आहे. ४.३० वाजता ही बैठक होईल.

- Advertisement -

लेटरबॉम्बनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली

महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री सचिन वाझे प्रकरण आणि परबीर सिंग यांच्या पत्रावर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते. परमबीर सिंग यांच्या पत्राने सरकारच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बाजू लावून धरत असताना काँग्रेस कुठेच दिसत नाही आहे. दरम्यान, आता या सगळ्या घडामोडी नंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यातील घडामोडींचा अहवाल हायकमांडने काँग्रेसच्या नेत्यांकडून मागवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर काँग्रेस काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Letter Bomb: काँग्रेसच्या गोटात हालचाली; एच.के. पाटील यांनी घेतली बैठक


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -