घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांची रावसाहेब दानवेंना खुली ऑफर, काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुख्यमंत्र्यांची रावसाहेब दानवेंना खुली ऑफर, काय म्हणाले मुख्यमंत्री ?

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच व्यासपिठावर आजी माजी सहकारी हे उद्या भावी सहकारी होतील, अशा आशयाचे विधान केले. उद्या आजी माजी सहकारी सगळे एकत्र आले तर भावी होतील, पण हे येणारा काळच हे ठरवेल अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरे यांनी दिली. औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले. हे सगळे माझे आजी माजी सहकारी होते. उद्या सगळे एकत्रपणे भावी होतील, असेही ते म्हणाले. रावसाहेब दानवेंना मुंबईला चर्चेला येण्यासाठीची ऑफर दिल्याबाबतची मुख्यमंत्र्यांनी यावेळी खुलासा केला. बुलेट ट्रेनच्या कनेक्टिव्हिटीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी एक मागणी केंद्राकडे केली असल्याचे यावेळी सांगितले. (CM uddhav thackeray statement on alliance with bjp in aurangabad)

दानवेंना ऑफर काय ?

गमतीचा भाग एका बाजुला आणि राजकारण एका बाजुला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणातील विकृत स्वरूप थांबायला हवे असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून राज्यात आहोत, तर केंद्रात भाजपचे मोदींच्या नेतृत्वातील सरकार आहे. अशावेळी आपल्या पदाचा राज्यासाठी काय उपयोग करून देता येईल हे उदिष्ट असायला हवे. रावसाहेब दानवे हे आमचे माजी सहकारी आहेत. तसेच रावसाहेब दानवे बरेच दिवस मुंबईला आलेले नाहीत. त्यामुळेच रावसाहेब दानवेंना मुंबईला बोलावल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रावसाहेब दानवेंना मुंबईत बोलावण्यामागचे कारणही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रावसाहेब दानवेंना मुंबईत बोलावण्याच्या संभाषणा दरम्यान गमतीजमती झाल्या. रावसाहेब दानवेंना बोलावण्याचे कारण म्हणजे बुलेट ट्रेन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

नागपूर मुंबई शहरे बुलेट ट्रेनने जोडल्यास…

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या आधी राजधानी आणि उपराजधानी जोडा अशी आमची मागणी होती. मुंबई आणि नागपूर ही दोन शहरे आपण हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय महामार्गाने जोडतो आहोत. पण ही दोन शहरे जर बुलेट ट्रेनने जोडली जाणार असतील तर पुर्ण पाठिंबा आणि पुर्ण सहकार्य राज्य सरकार करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा ५० टक्के वाटा बंद करण्यात आलेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. संभाजीनगर आणि नगर तसेच पुणे – नाशिक या रेल्वेमार्गासाठी आम्ही तयारी दर्शवली आहे. जे प्रकल्प जनतेच्या हिताचे आहेत तसेच ज्याठिकाणी राज्य सरकारला आपला वाटा उचलणे आवश्यक आहे, तिथे आम्ही कधीच नाही म्हटलेले नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -