घरताज्या घडामोडीअमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबद्दल कपोलकल्पित बातम्या हा खोडसाळपणा, आशिष शेलारांचं स्पष्टीकरण

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबद्दल कपोलकल्पित बातम्या हा खोडसाळपणा, आशिष शेलारांचं स्पष्टीकरण

Subscribe

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांची राजकीय विषयावर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. दरम्यान, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबद्दल कपोलकल्पित बातम्या हा खोडसाळपणा असल्याचं स्पष्टीकरण मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांनी ट्वीट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या घोषित कार्यक्रमा व्यतिरिक्त अन्य राजकीय भेटीसाठीबाबत कपोलकल्पित, उलटसुलट बातम्या चालवण्याचा खोडसाळपणा स्वखुशीने माध्यमांमध्ये सुरू आहे. तो फार हास्यासपदचं, असं आशिष शेलारांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भाजप आणि मनसेच्या युतीबाबतचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाला वाढविण्याचे काम मी करत आहे. संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेसोबत शिवसेना एका बाजूला युती करतेय, तर दुसरीकडे हिंदुत्वाची भाषा करत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी आहे. शिवसेना सध्या गडबडलेल्या अवस्थेत आहे. शिवसेना शरद पवार आणि काँग्रेससोबत जाते. नंतर आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवते. त्यामुळे मतदानाच्या वेळी जनताच काय ते ठरवेल, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे घेणार राज ठाकरेंची भेट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -