घरमहाराष्ट्रशिवाजी पार्क मैदानात काँक्रिटचा रस्‍ता; आरोप चुकीचे : महापौर

शिवाजी पार्क मैदानात काँक्रिटचा रस्‍ता; आरोप चुकीचे : महापौर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना शिवाजी पार्क या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार महापौर पेडणेकर यांनी सोमवारी सकाळी पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह शिवाजी पार्क या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

मुंबई : दादर (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे मधोमध पालिकेकडून सिमेंट काँक्रिटचा रस्‍ता बनविण्‍यात येत असल्‍याबाबतची सोशल मिडियावरील माहिती संपूर्णपणे चुकीची आहे. या मैदानाच्या विकासकामांच्या अंतर्गत आंतरराष्‍ट्रीय मैदानांवर ज्‍याप्रमाणे हिरवळ राखली जाते, त्‍यावर सिंचन केले जात आहे, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय. याप्रसंगी पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत या उपस्थित होत्या.

शिवाजी पार्क येथील मैदानात खडी टाकून परस्पर रस्ता बनविण्यात येत असल्याची तक्रार काही स्थानिक रहिवाशांनी मनसेचे नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली होती. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना शिवाजी पार्क या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार महापौर पेडणेकर यांनी सोमवारी सकाळी पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासह शिवाजी पार्क या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisement -

त्यानंतर त्यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानुसार महापौरांनी, शिवाजी पार्क मैदानात कोणत्याही प्रकारचा काँक्रिट रस्ता बनविण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. महापालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ( शिवाजी पार्क) मधोमध काम सुरू असलेला भाग हा मातीचा पट्टा आहे. त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी खडी टाकण्यात आली आहे.

ही पद्धती म्‍हणजे सर्व आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या मैदानांवर पाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली जाते, त्‍यासारखीच आहे. मुंबईतील वानखेडे मैदान, ब्रेबॉर्न मैदानांवरही अशीच पद्धती उपयोगात आणली आहे, असे महापौर यांनी म्हटले आहे. मात्र काही लोकांनी, सदर मैदानावर मधोमध खड्डा खोदून खडी टाकून तेथे काँक्रिटचा रस्‍ताच तयार होत असल्याचा गैरसमज सोशल मिडियावर नाहक पसरवल्याने समस्या निर्माण झाली होती, असे महापौर यांनी सांगितले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -