घरताज्या घडामोडीभाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली; राहुल गांधींचा हल्लाबोल

भाजपाने देशात भीती, द्वेष आणि हिंसा पसरवली; राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपाने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. आपण देशात कुठेही पाहिले तर आपल्या भीती, द्वेष आणि हिंसा पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपाने पसरवलेल्या भिती, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात हल्लाबोल केला.

देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपाने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. आपण देशात कुठेही पाहिले तर आपल्या भीती, द्वेष आणि हिंसा पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपाने पसरवलेल्या भिती, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपाविरोधात हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. आज ही यात्रात शेगावमध्ये पोहोचली असून शेगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर भाष्य केले नाही. (Congress Leader Rahul Gandhi Slams BJP In Bharat Jodo Yatra)

शेगाव येथील आयोजित सभेत गजानन महाराज की जय असे म्हणत राहुल गांधी यांनी सभेला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न मांडत भाजपावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, “भारत जोडो यात्रा जवळपास 70 दिवसांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झाली. भारताच्या शेवटच्या टोकापासून म्हणजेच समुद्र किनाऱ्यापासून भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर दररोज २५ किलोमीटर ही यात्रा चालते. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा आणि महाराष्ट्र ही यात्रा सुरू आहे. ही यात्रा सुरू झाली तेव्हा विरोधकांनी या यात्रेची काय गरज असा सवाल उपस्थित केला होता. काय फायदो होणार ही यात्रा काढून असाही सवाल विचारला होता”

- Advertisement -

भाजपाने द्वेष आणि हिंसा पसरवली

“देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपाने द्वेष आणि हिंसा पसरवली आहे. आपण देशात कुठेही पाहिले तर आपल्या भीती, द्वेष आणि हिंसा पाहायला मिळेल. त्यामुळे भाजपाने पसरवलेल्या भिती, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात आम्ही भारत जोडो यात्रा सुरू केली. या यात्रेतून तुम्हाला काही सांगायचे आणि समजवायचे नाहीये, तर तुमच्या मागण्या समजून घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. तुमच्यातील भिती ओळखण्यासाठी ही यात्रा आहे. भीती, द्वेष आणि हिंसेमुळे लोक तुटतता. पण प्रेमानी बोललो त्यांचे ऐकलं तर लोक जोडली जातात. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्याने या यात्रेवरून प्रश्न उपस्थित करत आहे. पण जर ते पाच मिनिटे तरी या यात्रेत चालली असती, तर त्यांना या यात्रेचा अर्थ कळला असता”, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपावर टीका केली.

विम्याचे पैसे भरले, पण आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही

“आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. का आणि कशासाठी केली. कोणत्याही शेतकऱ्याशी बोलले तर समजेल, की कृषीमालाला चांगला भाव मिळत नाही. सरकारला विचारून-विचारून थकलो. पण मला बाजारभाव मिळत नाही. आम्ही विम्याचे पैसे भरले, पण आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. शेतकऱ्यांवरील असलेल्या कर्जा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे. शेतकरी विचारतात की मोठ-मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ होते, मग आमचे कर्ज माफ का नाही होत”, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

- Advertisement -

“आमचे सरकार असताना विदर्भातील शेतकरी अडचणीत आले होते. त्यावेळी आम्ही तातडीने पॅकेज दिलं. मात्र आता शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरून देखील नुकसान झाल्यावर भरपाई मिळत नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची आवाज ऐकली तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद होतील. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करून शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला हवा,” असेही राहुल गांधी यांनी म्हटले.


हेही वाचा – मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -