Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भाजपला महाराष्ट्रातून उद्योगच नाही तर भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचंय, काँग्रेसची टीका

भाजपला महाराष्ट्रातून उद्योगच नाही तर भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचंय, काँग्रेसची टीका

Subscribe

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना महाराष्ट्रातील नवनवीन प्रकल्प आणि उद्योगधंदे हे दुसऱ्या राज्यात गेले. हे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. अशातच भाजपला महाराष्ट्रातून उद्योगच नाही तर भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचंय, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांकडून भाजपवर करण्यात आली आहे.

आसाम सरकारने भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग पुण्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा एका जाहिरातीत केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही जाहिरात शेअर केली आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारने याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

सचिन सावंत यांचं ट्वीट काय?

१/२ केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम सरकारचा दावा आहे की, भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.

- Advertisement -

भाजपाने केवळ महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

BBCवर आयकर विभागातर्फे छापा मारुन मोदी सरकार जगाला आपल्या खऱ्या चेहऱ्याचे दर्शन स्वतःच घडवत आहे आणि BBC ची भूमिका योग्य होती हेही अधोरेखित करत आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी ती हीच!, असंही ट्वीट करत सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.


हेही वाचा : अदानीचे पाप झाकण्यासाठी बीबीसी कार्यालयावर धाडी, मिटकरींचा मोदी सरकारवर हल्लाबोल


 

- Advertisment -