घरताज्या घडामोडी...अजूनही आरेतील झाडे कापली जाणार; काँग्रेस आमदार भाई जगतापांचा दावा

…अजूनही आरेतील झाडे कापली जाणार; काँग्रेस आमदार भाई जगतापांचा दावा

Subscribe

आरेतील झाले मेट्रो कारशेडसाठी कापली जाणार असल्याचा दावा कॉग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला आहे. कांजुरमार्गची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला. विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशाचा आज सहावा दिवस आहे. आज सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Congress MLA Bhai Jagtap claims that the trees in Aarey will be cut for the car shed of the Metro)

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना भाई जगताप यांनी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या आरे कारशेडच्या मुद्द्यावर निशाणा साधला. मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील झाडे कापली जाणार आहेत, असा दावा भाई जगताप यांनी केला. तसेच, कांजुर्मागची जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी सोडली जातेय, असा आरोप जगताप यांनी केला.

- Advertisement -

यावेळी भाई जगताप यांनी ५० खोक्यांच्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भूसे आक्रमक झाले. कोणी ५० खोके घेतले असा सवाल विचारला? तसेच, अशा घोषणा आम्हालाही देता येतात. त्यामुळे घोषणा देताना विचार करावा अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दाद भूसे यांनी दिला.

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -