घरमहाराष्ट्रनाशिककाँग्रेसने आता आत्मचिंतन करावं, थोरातांच्या राजीनाम्यानंतर तांबेंकडून कानपिचक्या

काँग्रेसने आता आत्मचिंतन करावं, थोरातांच्या राजीनाम्यानंतर तांबेंकडून कानपिचक्या

Subscribe

Satyajeet Tambe on Balasaheb Thorat Resignation | काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे असं आता सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

Satyajeet Tambe on Balasaheb Thorat Resignation | नाशिक – नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पदवीधर आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी मोठं विधान केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे असं आता सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या मनधरणीसाठी अशोक चव्हाण सक्रिय; म्हणाले, पक्षवाढीसाठी वाट्टेल ते!

- Advertisement -

संगमनेरमध्ये आज निवृत्ती महाराजांचं किर्तन आयोजित करण्यात आलं आहे. यानिमित्ताने ते बोलत होते. राजकारणातली नेते मंडळी दिशा द्यायचे आणि लोक ऐकायचे. आता जमाना बदलला आहे. लोकांना जे आवडतं ते करावं लागतं अशी स्थिती आहे. अशा स्थितीत कुणीतरी समाजाला आरसा दाखवला पाहिजे ते निवृत्ती महाराज करत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचं नाव मोठं केलं तसंच महाराजही करत आहेत असं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

- Advertisement -

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काही कॉंग्रेस आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. कॉंग्रेस पक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेक नेते दिल्ली दरबारी तक्रारी करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. अशात आता बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढदिवशीच राजीनामा बॉम्ब टाकल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत संवाद साधत पक्षाच्या व्यासपीठावरच याबाबत चर्चा व्हावी अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

हेही वाचा – भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांच स्वागतच…; थोरातांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान

बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तक्रारीचं पत्र दिलं होतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाढत असलेला वाद पाहता येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रभारी एच.के. पाटील यांनी काँग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीआधीच बाळासाहेब थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच सोपवल्याने आता राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -