घरमहाराष्ट्रकॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप! बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

Subscribe

शिवसेनेतील बंड अद्याप शमलेले नसताना प्रदेश काँग्रेस देखील बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

शिवसेनेतील बंड अद्याप शमलेले नसताना प्रदेश काँग्रेस देखील बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रसचे दोन बडे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्या सुरू असलेला वाद आता विकोपाला गेलाय. कॉंग्रेस पक्षात असलेला अंतर्गत कलह आता शिगेला पोहोचला असून बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. बाळासाहेबांच्या या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठा धमाका झाला आहे.

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सरळ सरळ आघाडी उघडली असून, बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत होतं. नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून सुरू झालेला वाद आता थेट राजीनामापर्यंत येऊन पोहोचला आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काही कॉंग्रेस आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. कॉंग्रेस पक्ष नाना पटोले यांच्याबाबत अनेक नेते दिल्ली दरबारी तक्रारी करत असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. अशात आता बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वाढदिवशीच राजीनामा बॉम्ब टाकल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी पक्षातील त्यांच्या निकटवर्तीय आमदारांसोबत संवाद साधत पक्षाच्या व्यासपीठावरच याबाबत चर्चा व्हावी अशी रणनीती आखल्याची माहिती आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत तक्रारीचं पत्र दिलं होतं. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाढत असलेला वाद पाहता येत्या १० फेब्रुवारी रोजी प्रभारी एच.के. पाटील यांनी काँग्रेस आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यामध्ये थोरात आणि पटोले यांच्या नेतृत्वाबाबत थेट चर्चा घडवून आणण्याचे प्रयत्न करण्यात येणार होते. मात्र, या बैठकीआधीच बाळासाहेब थोरात यांनी थेट विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच सोपवल्याने आता राजकीय वर्तुळात मोठा भुकंप झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -