घरमहाराष्ट्रआयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंची औरंगाबादला बदली

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंची औरंगाबादला बदली

Subscribe

बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकें यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकें यांनी दलित बांधवांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले असल्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती. या व्हिडिओवरुन आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंची बदली करावी अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती. या वादग्रस्त विधानाने भाग्यश्री नवटकेंची बदली औरंगाबादला करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

असे केले होते वक्तव्य

अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येणाऱ्या दलितांना मी फोडून काढले आहे. २१ जण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते त्यांना मी बेदम मारहाण केली आहे. तसेच अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त चोप देते असे त्या या व्हिडिओमध्ये म्हणाल्या होत्या. व्हायरल व्हिडिओमध्ये माजलगावच्या महिला पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके या मराठा समाजातील काही सदस्यांशी चर्चा करताना दिसत आहे. ही व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा – अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांना फोडून काढते – आयपीएस नवटके


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -