चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या महिला शाखाप्रमुखांचा राडा; पुरुष शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा

मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी-माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. चेंबूर कॅम्प परिसरामध्ये ठाकरे गटाच्या शाखा 154 मध्ये हा राडा झाल्याचे समजते.

मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी-माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. चेंबूर कॅम्प परिसरामध्ये ठाकरे गटाच्या शाखा 154 मध्ये हा राडा झाल्याचे समजते. (controversy between thackeray group women in chembur camp area)

ठाकरे गटाच्या आजी-माजी महिला शाखाप्रमुखांमध्ये मंगळवारी मध्यरात्री शाखेच्या जागेवरुन हा वाद झाला. महिला शाखाप्रमुखांच्या या वादामुध्ये काही पुरुष शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या राड्याप्रमकरणी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून, अधिक तपास करत आहेत.

ठाकरे गटाच्या शाखा 154 मध्ये मध्यरात्री वाद सुरू असल्याचे समजताच, त्याठिकाणी चेंबूर पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच, आजी-माजी महिला शाखा प्रमुखांसह सर्व कार्यकर्त्यांना समजून पोलिस स्टेशनला नेले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी पडली. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली. असे असतानाच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटात नवा वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा वाद शाखेच्या ताब्यावरून होत आहे.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला होता. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. शिवाय, नवी मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटात शाखा कार्यालय हक्क वाद अद्याप थांबलेला नाही. तुर्भे येथील सेना कार्यालयास उद्धव ठाकरे गटाने लावलेले टाळे व फलक पोलिसांच्या उपस्थितीत शिंदे गटाने काढले. त्यानंतर हा अन्याय असून न्यायालयायीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच पोलिसांच्या मदतीने शिंदे गटाने दादागिरी करीत शाखेचा ताबा घेतल्याचा दावा ठाकरे गटाने केला. यावेळी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाने हा दावा केला होता.

याशिवाय, ठाणे जिल्ह्यातील कोपरी येथील कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरुन शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही केला होता.


हेही वाचा – मुंबई – गोवा : भोस्ते घाटात एलपीजी टँकर उलटला; महामार्गवर वाहतूककोंडी