घरCORONA UPDATECorona : पुण्यात रुग्णसंख्येने ओलांडला ५५००चा टप्पा; १७१ रुग्ण अत्यवस्थ!

Corona : पुण्यात रुग्णसंख्येने ओलांडला ५५००चा टप्पा; १७१ रुग्ण अत्यवस्थ!

Subscribe

राज्यभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना पुणे शहराला कोरोनानं कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही कंटेनमेंट झोन असून अनेक ठिकाणी रेड झोन असल्यामुळे नागरिकांच्या फिरस्तीवर कठोर निर्बंध आहेत. मात्र, असं असून देखील पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. पुणे महानगर पालिकेकडून कोरोना रुग्णांची शेवटची आकडेवारी बुधवारी रात्रीपर्यंतची हाती आली, तोपर्यंत पुण्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजारांच्या देखील वर गेला होता. बुधवारी दिवसभरात पुणे शहरात एकूण १०६ नवे कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे आता पुण्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ५३३ इतका झाला आहे. बुधवारी १८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे ही पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. मात्र, बुधवारी झालेले ११ मृत्यू ही चिंतेत भर घालणारी ठरली असून पालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसाठी अधिक सतर्क करणारी बाब ठरली आहे.

५० रुग्ण व्हेंटिलेटरवर!

पुणे शहरात सध्याच्या घडीला एकूण २ हजार १९० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे इतर रुग्णांना कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र, अजूनही पुण्याच्या विविध रुग्णालयांमध्ये १७१ रुग्ण अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी सापडलेल्या नव्या १०६ कोरोनाबाधितांमध्ये ८ रुग्ण शहरातल्या ससून रुग्णालयात, नायडू आणि पालिकेच्या इतर रुग्णालयांत ४१ तर शहरातल्या काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. १७१ अत्यवस्थ रुग्णांपैकी १२१ रुग्ण आयसीयूमध्ये असून तब्बल ५० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

- Advertisement -

पुणे शहरात आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण २८४ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे शहरातल्या मृतांचा आकडा आकडा आता हळूहळू वाढू लागला आहे. ही प्रशासकीय यंत्रणेसाठी चिंतेची बाब असली, तरी प्रशासनाकडून अजूनही बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शक्य असेल तर घरातच थांबण्याचं आवाहन केलं जात आहे. त्यासोबत रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेनमेंट झोनचे नियम पाळण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -