घरCORONA UPDATEधक्कादायक! पुण्यातील कोरोनाबाधित महिलेने थेट गाठली दुबई!

धक्कादायक! पुण्यातील कोरोनाबाधित महिलेने थेट गाठली दुबई!

Subscribe

कोरोनाबाधित महिलेला होम क्वारंटाईनचे आदेश असताना पुण्यातील या महिलेने थेट दुबई गाठली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पुण्यात घडला. या महिला रहात असणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील सदस्यांनी तसं पत्र हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलं आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण कमीत कमी १० दिवस आणि जास्तीत जास्त १४ दिवस किंवा पुन्हा स्वॅब निगेटिव्ह येईपर्यंत होमक्वारंटाइन राहणं महत्वाचं असतं

११ जुलैला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेने खासगी रूग्णालयात टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानुसार तेथील डॉक्टरांनी सौम्य लक्षण असल्याने महिलेला होम क्वारंटाइन होण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे महिला शुक्रवारपर्यंत सहा दिवस घरात क्वारंटाइन होती. मात्र, त्यानंतर आता ही महिला दुबईत राहत असलेल्या पतिकडे गेली आहे. सोसायटीधारकांनी यावर प्रश्न निर्माण करत, ही महिला खोट बोलून विमान प्रवास करून दुबईला गेल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

या विषयी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंतर गवारी म्हणाले की, “संबंधित महिला कोरोना पॉझिटिव्ह असून सहा दिवस होम क्वारंटाइन होती. त्यानंतर ती दुबईला विमान प्रवास करून गेली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने महिलेविरोधात तक्रार केल्यास गुन्हा दाखल करणार आहोत. या प्रकरणी संबंधित महिला राहात असलेल्या सोसायटीधारकांनी आम्हाला पत्र दिले आहे. त्यानुसार पुढील कारवाई करू.


हे ही वाचा – आता सरकार करणार न्यायमूर्ती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चष्म्याचा खर्च!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -