घरमहाराष्ट्रआता कार्यालयातच मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

आता कार्यालयातच मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

Subscribe

ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली. देशभरात सध्या तिसऱ्या टप्पांतील लसीकरण सुरु आहे. यातच आता केंद्र सरकारने लसीकरणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. आता कोरोना लस घेण्यासाठी कोणत्याही खासगी किंवा सरकारी कोरोना सेंटरवर किंवा रुग्णालयात जाण्याची गरज नाही. तर नागरिकांना आता त्यांच्या ऑफिसमध्येच लस घेता येणार आहे. ऑफिस कर्मचाऱ्यांना ते जिथे काम करत असणार तिथेच लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे. वर्कप्लेसमध्ये कोरोना लसीकरण राबवण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली असून ११ एप्रिलपासून ही सुविधा उपलब्ध करुण दिली जाणार आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. ही लस फक्त संबंधीत ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच मिळेल. कर्मचाऱ्यांचे नातेवाईक तसेच ऑफिसबाहेरील इतर कोणाला मिळणार नाही. सोबतच केंद्रिय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या या सूचनेनुसार एकावेळी फक्त १०० लोकांना लसीकरण केले जाईल. सध्या १ एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यात नियमानुसार ४५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जात आहे. त्यामुळे याच निकषात बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे.


हे वाचा एकाच व्यक्तीच्या दोन चाचण्यांचे रिपोर्ट का येतात वेगवेगळे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -