घरCORONA UPDATEशिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद

Subscribe

एका ज्येष्ठ शिवसैनिकास कोरोनाची लागण

कोरोना विषाणूने आता शिवसेना भवनात शिरकाव केला आहे. शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका ज्येष्ठ शिवसैनिकास कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. शिवसेना भनवानाचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

कोरोनाची लागण झालेले ज्येष्ठ शिवसैनिक पक्षाच्या एका खासदाराचे निकटवर्तीय आहेत. संबंधित शिवसैनिकास कोरोनाची लागण झाल्यानंतर कालपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही दिवस शिवसेना भवनात न येण्याच्या पक्षकडून सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या वाहन चालकांनाही कोरोनाची लागण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहन चालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन वाहनचालकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या काही शासकीय सुरक्षा रक्षकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -