Corona Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू तर १,४१३ नवे रुग्ण!

corona live update
कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला असून १,४१३ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४०,८७७वर पोहोचला असून मृतांचा आकडा १ हजार ३१९ झाला आहे. तसेच २४ तासांत १९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण १६ हजार ९८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

अंबरनाथमध्ये सोमवारी कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये अंबरनाथ पोलीस स्टेशनमधील एसआरपीएफचे ३० व ३५ वयोगटातील दोन जवान तसेच २७ वर्षीय परिचरिकेचा समावेश आहे. आतापर्यंत अंबरनाथमध्ये कोरोनाचे १८८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ जणांना उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे. तर ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


आज राज्यात २ हजार ३६१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७० हजार १३वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा २ हजार ३६२ झाला आहे. तसेच दिवसभरात ७७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण ३० हजार १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी (३१ मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची व्यवस्था राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने विविध मच्छीमार सोसायट्यांशी संपर्क साधून पोलिस आयुक्त झोन ११ यांच्या सहकार्याने हे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सागरी क्षेत्रात मढ, भाटी, मुंबई उपनगर, मुंबई शहरासह सात सागरी जिल्ह्यांमध्ये मासेमारी व्यतिरिक्त नौका दुरुस्ती, नौका बांधणी, जाळी विणणे व बांधणी, बर्फ कारखाने, मासळी प्रक्रिया उद्योग, मासळी व्यापार या वेगवेगळ्या कामांतून शाश्वत रोजगार उपलब्ध होत असल्याने इतर राज्यातले मच्छीमार महाराष्ट्रात येतात. १ ऑगस्ट ते ३१ मे हा मासेमारी हंगामा असल्याने आणि १ जुन ते ३१ जुलै सागरी मासेमारीवर बंदी असल्याने हे मच्छीमार आपापल्या राज्यांमध्ये परतत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे आता श्रमिक ट्रेनद्वारे या मच्छीमारांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान मढ मच्छीमार वि.का.स., मढ दर्यादिप संस्था, हरबादेवी मच्छी. संस्था,  मालवणी मच्छी. संस्था या सोसायट्यांचे मिळून २३०० मच्छीमार आणि खलाशी ट्रेन्समधून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश  या राज्यांकडे रवाना झाले. या मच्छीमारांना रेल्वेस्थानकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४५ पेक्षा जास्त बेस्ट बसेसची व्यवस्था राज्य सरकारने केली.


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाघरमध्ये दोन एनडीआरएफचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. एकूण नऊ पथके राज्यात तैनात करण्यात आली आहे.


मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ३९ हजार

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर राज्यातील मुंबईत सर्वात अधिक रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तर मुंबईत ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकडेवारीमुळे ७ व्या स्थानावर आला भारत

देशात कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतात आता १ लाख ८२ हजार १४३ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर ५ हजार १६४ जणांचा मृत्यू यामुळे झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार भारत हा कोरोना संसर्गाच्या यादीत सातव्या स्थानावर असल्याचे पाहायला मिळत होते. यापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. (सविस्तर वाचा)


आजपासून २०० विशेष रेल्वे गाड्या धावणार

भारतीय रेल्वे सोमवारी १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवणार आहे. या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असतील. २१ मेपासून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू झालं आहे. प्रवाशांना आता या गाड्यांसाठी १२० दिवस म्हणजेच ४ महिन्यांपूर्वी रिजर्वेशन करता येणार आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर

मुंबईत दिवसभरात १ हजार २४४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. मुंबईत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचली आहे.


राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५

राज्यात रविवारी २ हजार ४८७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६७ हजार ६५५ झाली आहे. तसेच ८९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २ हजार २८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे १ हजार २४८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने राज्यात आजपर्यंत २९ हजार ३२९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. (सविस्तर वाचा)