Corona Live Updates: राज्यात ५५२ नवीन रुग्णांची नोंद; आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ६४८ इतकी असून ८२ हजार २९९ लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर ६ हजार ९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

US Corona Update

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पालघरमधील गडचिंचले गावात घडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, पालघरच्या हत्याकांडाने गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे, त्यामुळे या घटनेची नैतिक जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.


राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी ४ हजार पार गेला आहे. रविवारी राज्यात ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी ५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. तर १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील धारावी येथे आज २० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १३८ वर गेली आहे. तर आतापर्यंत येथील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधील २४ तर वोक्हार्ड हॉस्पिटलमधील २६ कर्मचाऱ्यांची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांची आधीची चाचणी ही निगेटिव्ह आली होती. मात्र कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांना २१ दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या सर्व ५० कर्मचाऱ्यांची दुसरी चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे.


गोवा कोरोनामुक्त झाल्याची माहिती आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. (सविस्तर वाचा)


औरंगाबादमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात. त्यामुळे आतापर्यंत औरंगाबादमध्ये ८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात आतापर्यंत १५ हजार ७१२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच आतापर्यंत देशात ५०७ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला असून २३ राज्यांमध्ये ४३ जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद


भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्ये टाकल्याबाबत नाराजी दर्शवली आहे. त्यासंबंधीचे ट्विट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केले आहे.


‘शत्रू समोर दिसला असता तर एक घाव दोन तुकडे केले असते’, पण, हा शत्रू दिसत नाही. तसेच तो इतका विचित्र आहे की, तो आपल्या संपर्कातूनच प्रसार करत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच ‘कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जा आणू उपचार करुन घ्या. कोरोना झाला म्हणजे सगळं संपले, असे समजू नका’, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत. तर राज्यात कोरोनाच्या ६६ हजार ७९६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘जिल्हा बंदी कायम असेल, पण मालवाहतुकीला परवानगी’ देण्यात आली आहे.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. 


कोरोनाबाधितांंच्या मृत्यूचा आकडा वाढला

देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असून मागील २४ तासांमध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढली आहे. आतापर्यंत देशभरात रुग्णांची संख्या १५ हजार ७१२ इतकी झाली आहे. तर, या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही ५०७ इतकी झाली आहे.


भाजपाच्या दोन आमदाराविरोधात गुन्हा दाखल

लॉकडाउनमध्ये चिथावणीखोर भाषण दिल्यामुळे राजस्थानमधील भाजपाच्या दोन आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोटा येथील महावीर नगर पोलीस स्टेशनमध्ये रामगंजमंडीचे भाजपा आमदार मदन दिलावर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य एका प्रकरणामुळे जयपुरच्या मानसरोवर पोलीस स्टेशनमध्ये सांगानेरचे भाजपा आमदार अशोक लाहोटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे पुन्हा डोके वर

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना राज्यातील रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. शनिवारी राज्यात ३२८ नवीन रुग्ण सापडले असून, मागील काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. तसेच चार दिवसांच्या मृतांच्या तुलनेत कोरोनाबाधित मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यात ३ हजार ६४८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या २११ असून सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून ६ हजार ९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (सविस्तर वाचा)


बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार

कोरोनामुळे लॉकडाऊनचा नियम कडक करण्यात आला असून या कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली असल्याने बांधकाम कामगारांना दररोज रोजगार मिळत नसल्यामुळे हातावर पोट असणार्‍या कामगारांचे प्रचंड हाल सुरू आहेत. हे लक्षात घेऊन १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (सविस्तर वाचा)