घरमहाराष्ट्रचिंताजनक! साताऱ्यात बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोनाचं थैमान; ६१ जण पॉझिटिव्ह

चिंताजनक! साताऱ्यात बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोनाचं थैमान; ६१ जण पॉझिटिव्ह

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६३ हजार २९४ कोरोनाबाधित नवे रूग्ण आढळल्याने पुन्हा राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशापरिस्थितीत चिंतेत वाढ म्हणजे सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा चांगलीच महागात पडली आहे. सातारा जिल्हा प्रशासनानं दिलेले आदेश डावलून बगाड यात्रा आयोजित करणं चांगलंच अंगलट आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावधनच्या बगाड यात्रेमध्ये सहभागी झालेले भाविक आणि बंदोबस्तावर असणारे पोलीस असे एकूण ६१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

ही यात्रा झाल्यापासून गावातील तब्बल ६१ जण पॉझिटिव्ह आढळले गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा मानली जाते. यात्रेदरम्यान कोरोनाच्या नियामांचं पालन न करणाऱ्या पोलिसांनी ८३ जणांवर अटकेची कारवाई देखील केली. या बाधित रुग्णांमुळे बावधन गावाच्या आजूबाजूच्या वाघजाईवाडी, पांढरेचीवाडी, म्हातेकरवाडीमध्ये कोरोनाचा आकडा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळं जिल्हा प्रशासनाच्या आदेशानं वाई तालुक्यातील काळुबाईची यात्रा, कराड तालुक्यातील पालच्या खंडोबाची यात्रा अशा मोठ्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावात रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा प्रशासनाने घालून दिलेले कोरोनाच्या नियम‌ांचे उल्लंघन करून ग्रामस्थांनी साजरी केली होती. बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या यात्रेच्या बंदोबस्तात असणारे ८ पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस उपनिरिक्षक कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे वाई तालुक्यात कोरोनाबाधितांचा वाढता पाहता कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -