घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगणेशोत्सवावर जीएसटीमुळे दरवाढीचे संकट

गणेशोत्सवावर जीएसटीमुळे दरवाढीचे संकट

Subscribe

गणेशमूर्तींच्या किंमतीत यंदा ५ टक्क्याने वाढ

मानसी पाटील । नाशिक

विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवासाठी सर्वदूर जोरदार तयारी सुरू असताना बाप्पांच्या या उत्सवावर यंदा दरवाढीचे संकट आले आहे. सरकारने कच्च्या मालावर लागू केलेल्या जीएसटीमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना महागाईची झळ बसणार आहे.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे संकट होते. परिणामी इच्छा असूनही भाविकांना गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदा मात्र कोरोनाचे संकट दूर झाल्याने सर्वदूर उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तीकार बाप्पांवर अखेरचा हात फिरवत असताना भाविकांकडूनही या उत्सवाचे नियोजन सुरू आहे. दरम्यान, मूर्तींच्या उंचीबाबत ऐनवेळी झालेला निर्णय आणि दरवाढीमुळे या उत्सवावर काहीसे नाराजीचे सावटदेखील आहे. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्बंधांमुळे गणपती मूर्ती शाडू मातीची की पीओपीची (प्लास्टर ऑफ पॅरिस) याबद्दल संभ्रम कायम आहे. कोरोना काळात प्रशासनाने पीओपीच्या मूर्तीबद्दल ठोस भूमिका घेतलेली नव्हती. मात्र, यंदा पीओपीच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्त्यांना अधिक पसंती असल्याचे मूर्तीकारांनी ’आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

पावसाळी वातावरणाचा अडसर

गणेशमूर्तींच्या उंचीवरील मर्यादा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर दूर झाली असली तरीही, या मूर्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल, मूर्ती वाळविण्यासाठी लागणारा वेळ मूर्तीकारांच्या हाती नाही. त्यातच सध्या पावसाळी वातावरण असल्याने मूर्ती सुकण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे यंदा मोठ्या मूर्तींचा तुटवडा भासणार आहे.

- Advertisement -

शाडूच्या तुलनेत पीओपी निम्म्याने स्वस्त

पीओपीपासून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा वेळ, ओतीव काम आणि पीओपीची उपलब्धता पाहता या मूर्ती शाडू मातीच्या मूर्तींच्या तुलनेत साधारण निम्म्याहून अधिक स्वस्त मिळतात. म्हणजे, एक फुटाची शाडूमातीची मूर्ती १ हजारांना मिळत असेल तर तेवढीच पीओपीची मूर्ती ५०० रुपयांना मिळते. त्यामुळे आजवर शाडूमातीच्या तुलनेत पीओपी मूर्ती निर्मिती आणि खरेदीलाही अधिक पसंती मिळत आली आहे.

परदेशातूनही मागणी कायम

गणेशमूर्ती बनविण्यासाठी पेण तालुका प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या गणेशमूर्तींना ऑस्ट्रेलिया, युरोपसारख्या देशातूनही मागणी असते. मूर्तींची उपलब्धता लक्षात घेता अनेक भाविकांनी आपल्या आवडीच्या मूर्ती आधीच बूक करुन ठेवलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -