घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआदिवासी समाजाचा असल्याने राष्ट्रवादीकडून माझ्यावर टीका : मधुकर पिचड

आदिवासी समाजाचा असल्याने राष्ट्रवादीकडून माझ्यावर टीका : मधुकर पिचड

Subscribe

अकोले : भाजप पक्षात प्रवेश केला तेव्हा माझ्यासोबत पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही प्रवेश केला. मात्र, त्यांच्यावर राष्ट्रवादी नेत्यांकडून टीका टिप्पणी झाली नाही की आम्ही तुम्हाला पदे देऊन मोठे केले हे म्हंटले नाही. कारण ते त्यांच्या नात्यातील व कुळातील आहेत. मात्र, मी आदिवासी समाजाचा असल्याने माझ्यावर पद दिल्याची आणि पक्ष बदलण्याची टीका होत आहे, अशी खंत माजीमंत्री मधुकर पिचड यांनी राजूर येथे झालेल्या आदिवासी मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेत अजित पवार यांचे नाव न घेता व्यक्त केली .

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्याबद्दल क्रांतीदिनाचे व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अकोले तालुक्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. मधुकर पिचड म्हणाले की, महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाल्या त्यावेळी त्यांचे देशभर सर्वपक्षीयांनी स्वागत केले. मात्र, ७५ वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्यावर विरोधी खासदारांनी त्यांचा राष्ट्रपत्नी म्हणून अवमान केला. प्रतिभाताई उच्चवर्णीय आणि द्रौपदी या आदिवासी आहेत म्हणून अवमान केला. गेली ७५वर्षे होऊनही आदिवासी समाजाला मान, सन्मान मिळाला नाही, तो राष्ट्रपती सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदी व भाजप पक्षाने देऊन देशातील आदिवासी समाजाचा खर्‍या अर्थाने सन्मान केला. आजपर्यंत आदिवासी समाजाला काही पक्षांनी वापरून घेतले. मात्र, त्यांना कुठेही सन्मानाचे पद दिले नाही. भाजप पक्ष आदिवासी समाजाचे कल्याण करणार नाही हे बिंबवले गेले.

- Advertisement -

मात्र, गेली आठ वर्षे देशात भाजपचे सरकार आले. आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले, तिरंगा फडकवण्याचे काम केवळ पुढारी, मंत्री, पदाधिकारी, अधिकारी यांनाच होता. तो अधिकार आता वाडीवस्तीतील माणसांना देण्याचे काम व देशातील सर्वानाच अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे येणार्‍या २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार वैभव पिचड असतील.

गेली अडीच वर्षे लोकप्रतिनिधींनी कोटीच्या कोटी उड्डाणे भरली, त्यांना साधा रस्ता दुरुस्त करता आला नाही की बंधारा बांधता आला नाही. ५०० कोटी आणले मग त्याचे काय केले. जो माणूस आदिवासी समाजाच्या महिलेस राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकत नाही. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे देवगाव येथे स्मारक बांधण्यात पुढाकार घेत नाही उलट दुसर्‍या तालुक्यात स्मारक बांधण्यासाठी समितीत जातो. त्यांनी आदिवासी समाजाचा स्वाभिमान जनतेला शिकवू नये. आता सरकार बदलले आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार राज्यात आले आहे.त्याचा निश्चित अकोले तालुक्यात फायदा होईल. मंत्री व आमदार नसलो तरी तालुक्यात विकासनिधी उपलब्ध करून विकासकामे करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -