घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या उपस्थितीत गर्दी

अजित पवारांच्या उपस्थितीत गर्दी

Subscribe

१०० ते १५० जणांवर गुन्हे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी उद्घाटन झाले. तेव्हा प्रचंड गर्दी जमली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निलम, बाळासाहेब बोडके, सरचिटणीस रोहन पायगुडे, युवक अध्यक्ष महेश हांडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सकाळी लोकांना लॉकडाऊन पुन्हा लावण्याची तंबी दिल्यानंतर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ खंत व्यक्त केली. यावरून अजित पवार यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. याबाबत शनिवारी पोलिसांनी चुप्पी साधली होती. व्हिडिओ आणि फोटो पाहून कारवाई करून असे सांगण्यात येत होते. मात्र, सोशल मीडियावर होत असलेली टीका टिप्पणीनंतर पोलीस कार्यरत झाले. त्यानंतर रविवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नोटीसप्रमाणे व शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे त्यांनी पालन न करता उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व महाराष्ट्र कोविड १९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दिनेश वीर यांनी फिर्याद दिली आहे.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण.. अशी अजित पवारांची अवस्था आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 11 मार्च रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी मी आंदोलन केले. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला, मला रात्री 3 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवले. मग, जामिनावर सोडले. अजित पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
 -गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -